Advertisement

मुंबईकर श्रेयस अय्यरचं दमदार शतक

न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या वनडे समान्यात मुंबईकर श्रेयस अय्यर यानं दमदार शतक ठोकलं आहे.

मुंबईकर श्रेयस अय्यरचं दमदार शतक
SHARES

न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध भारत (India) यांच्यातील पहिल्या वनडे (ODI) समान्यात मुंबईकर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यानं दमदार शतक ठोकलं आहे. श्रेयस अय्यरचं हे पहिलं शतक ठरलं आहे. भारतीय संघाचा कर्णधार (Indian Cricket Team Captain) विराट कोहलीनं (Virat Kohli) श्रेयस अय्यर आणि श्रेयसनं के. एल. राहूल (K. L. Rahul) याच्यासोबत अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या विकेटसाठी (Wicket) आश्वासक भागीदारी करताना टीम इंडियाला मोठी मजल मारून दिली. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं ३४८ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.

या सामन्यात भारताचे दोन्ही सालमीवीर (Openers) शिखर धवन (Shikhar Dhawan) व रोहित शर्मा हे दुखापतग्रस्त असल्यामुळं नवीन जोडीनं भारतीय संघाची सुरूवात केली. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) व मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) यांनी प्रथम फलंदाजी करत अनुक्रमे २० व ३२ धावा केल्या. त्यानंतर, फलंदाजीसाठी आलेल्या विराट कोहली व श्रेयस अय्यर यांनी १०० धावांची भागिदारी करत संघाचा डाव सावरला.


या सामन्यात मुंबईकर (Mumbaiker) श्रेयसनं १०७ चेंडूत ११ चौकार व १ षटकार मारत १०३ धावा केल्या. वनडेमधील श्रेयस अय्यरचं हे पहिलचं शतक आहे. विराटनं वनडेतील ५८ वं अर्धशतक पूर्ण करताना भारताला मोठ्या आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली. विराटनं ६१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं.

आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला. गतवर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघासाठी ही तिसरी एकदिवसीय सामन्यांची मालिका आहे. संघानं यापूर्वी वेस्ट इंडिज (विदेशात) आणि मायदेशातील मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. न्यूझीलंड संघ विश्वचषक (World Cup 2019) स्पर्धेत उपविजेता ठरल्यानंतर पहिल्यांदाच एकदिवसीय लढत खेळणार आहे.

यापूर्वी दोन्ही संघांदरम्यान झालेल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडनं मँचेरस्टरमध्ये विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताचा १८ धावांनी पराभव केला होता. भारताने या पराभवाची परतफेड गेल्या रविवारी संपलेल्या टी२० मालिकेत ५-० ने विजय मिळवत केली.हेही वाचा -

राज्याच्या तिजोरीत खडखडाट, निधी अभावी ‘१ रुपयात आरोग्य तपासणी’ योजना गुंडाळणार

शिवसैनिकांनी भाजप कार्यालयाबाहेर लावले आशीष शेलारांचे नग्नफोटोRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा