Advertisement

ऑस्ट्रेलिया विरूद्ध लढणार हा भारतीय क्रिकेट संघ

भारतीय नियामक मंडळानं (BCCI) भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया यांच्यात मायदेशी खेळल्या जाणाऱ्या दोन टी-२० आणि पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलिया विरूद्ध लढणार हा भारतीय क्रिकेट संघ
SHARES

भारतीय नियामक मंडळानं (BCCI) भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया यांच्यात मायदेशी खेळल्या जाणाऱ्या दोन टी-२० आणि पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह आणि न्यूझिलंड दौऱ्यानंतर विश्रांतीवर गेलेल्या कर्णधार विराट कोहलीचं पुनरागमन झालं आहे.


के.एल राहुलला संघात स्थान

बीसीआयनं पहिल्या दोन वन डे आणि टी-२० सामन्यांसाठी वेगळे संघ जाहीर केले आहेत. भारतीय संघामध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरलेल्या के.एल राहुलला स्थान देण्यात आलं आहे, तर फिरकीपटू रविंद्र जाडेजा, खलील अहमद, मोहम्मद सिराज यांना डच्चू देण्यात आला आहे. तसंच, उमेश यादव आणि सिद्धार्थ कौल यांना देखील संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, दोन टी-२० आणि पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात भुवनेश्वरला आराम देण्यात आला आहे. एकदिवसीय सामन्यातून दिनेश कार्तिकला वगळण्यात आलं आहे. विजय शंकर आणि रिषभ पंतला टी-२० आणि एकदविसीय सामन्यात संधी देण्यात आली आहे.


२४ फेब्रुवारीपासून सुरूवात

२४ फेब्रुवारीपासून ट्वेंटी-२० सामन्याने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन सामने विशाखापट्टणम् व बंगळुरु येथे होणार आहेत. त्यानंतर, २ मार्चपासून पाच सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरूवात होणार होईल. यातील पहिला सामना हैदराबाद, दुसरा सामना ५ मार्च रोजी नागपूर, तिसरा सामना ८ मार्च रोजी रांची, चौथा सामना १० मार्च रोजी मोहाली आणि पाचवा सामना १३ मार्च रोजी दिल्ली येथे होणार आहे.


भारतीय संघात पदार्पण सामना

बीसीसीआयनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या दोन टी-२० सामन्यांसाठी संघ जाहीर केला. यामध्ये फिरकीपटू मयंक मार्कंडेला संधी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी आयपीएल २०१८ मध्ये मयंकने मुंबई इंडियन्स संघाच्या वतीनं खेळताना धमाकेदार कामगिरी केली होती. त्यामुळं मयांकला टी-२० सामन्यात संधी दिली असून मयंकचा हा भारतीय संघात पदार्पण सामना आहे. मयंकने मुंबई इंडियंन्सकडून १४ सामने खेळला असून यामध्ये त्याने १५ विकेट घेतल्या आहेत.

टी-२० संघ :

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, विजय शंकर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, सिद्धार्थ कौल, मयांक मार्कंडे.



पहिल्या दोन वनडेसाठी भारतीय संघ :


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, पंत, सिधार्थ कौल, केएल राहुल.



उर्वरीत तीन वनडेसाठी भारतीय संघ :


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, रिषभ पंत, लोकेश राहुल.




हेही वाचा -

लॉच्या विद्यार्थ्यांना १० हजार रूपयांचा दंड

आंगणेवाडी जत्रेसाठी १० स्पेशल गाड्या



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा