Advertisement

लॉच्या विद्यार्थ्यांना १० हजार रूपयांचा दंड

नुकतच नालंदा या लॉ कॉलेजाच्या गोंधळाची भर पडली असून काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज न भरल्याने बीएलएस आणि एलएलबीच्या तब्बल ३५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

लॉच्या विद्यार्थ्यांना १० हजार रूपयांचा दंड
SHARES

काही महिन्यांपासून मुंबई विद्यापीठमध्ये लॉच्या परीक्षा, वेळापत्रक आणि निकालात गोंधळ पाहायला मिळत आहे. त्यात नुकतच नालंदा या लॉ कॉलेजाच्या गोंधळाची भर पडली आहे. काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज न भरल्यानं बीएलएस आणि एलएलबीच्या तब्बल ३५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा दंड विद्यार्थ्यांनी रोख रक्कमेच्या स्वरूपात भरावा असा नियम लादण्यात आला आहे. दंड न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 


नेमक प्रकरण काय ?

काही महिन्यांपूर्वी लॉ सीईटीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा कॉलेजमध्ये प्रवेश होऊन पहिल्या सेमिस्टरची परीक्षाही नुकतीच पार पडली. परंतु नालंदा लॉ कॉलेजच्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरले नसतील त्यांना विद्यापीठाच्या नियमानुसार दहा हजार रुपयाचा दंड आकारण्यात येईल अशी नोटीस लावण्यात आली. विशेष म्हणजे या नोटीसमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही रक्कम रोख स्वरूपात भरावी अशीही सुचना देण्यात आली. त्याशिवाय हा दंड न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची धमकीही कॉलेज मार्फत देण्यात आली आहे. 


विद्यार्थी संघटनांकडे धाव

याबाबत विद्यार्थ्यांनी प्राचार्यांशी चर्चा केली. पण हा विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय असून यात काही  होऊ शकत नाही. जर तुम्ही हा दंड भरला नाही तर तुमचे प्रवेश रद्द होतील, असं प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं. यानंतर यातील काही गरीब विद्यार्थ्यांनी रक्कम भरणं शक्य नसल्यानं स्टुडंट लॉ काऊन्सिल या विद्यार्थी संघटनेकडे धाव घेतली. 


मुंबई विद्यापीठ असो किंवा कॉलेज. विद्यार्थ्यांना एवढ्या मोठ्या रकमेचा दंड आकारणं म्हणजे चूकच आहे. कॉलेज प्रशासन विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करण्याची धमकी देत असेल तर विद्यापीठाकडून त्यांच्यावर कारवाई आवश्यक आहे. यासंदर्भात कुलगुरूंनी आता कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. 

सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडण्ट लॉ कौन्सिल



हेही वाचा -

२१ वर्षांनी मुंबई विद्यापीठात क्रीडा महोत्सव

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ, पण त्या नऊ दिवसांचा पगार कट



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा