२१ वर्षांनी मुंबई विद्यापीठात क्रीडा महोत्सव

मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या २२ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाला गुरुवारपासून सुरूवात झाली आहे.

SHARE

मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या २२ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाला गुरुवारपासून सुरूवात झाली आहे. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सुरू झालेला हा महोत्सव १८ फेब्रुवारीपर्यंत रंगणार आहे.


'या 'खेळांचा समावेश

क्रीडा महोत्सवात घेण्यात येणाऱ्या स्पर्धांमध्ये राज्यातील सर्व २० अकृषी आणि कृषी विद्यापीठं सहभागी होणार असून, यात कबड्डी(पुरुष व महिला), खो-खो (पुरुष व महिला), व्हॉलीबॉल (पुरुष व महिला), बास्केटबॉल (पुरुष व महिला), मार्ग व मैदानी स्पर्धा (पुरुष व महिला) या एकूण पाच खेळ प्रकारांचा समावेश आहे. १४ ते १८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धां विद्यानगरी संकुल कलिना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय वडाळा, भवन्स महाविद्यालय अंधेरी आणि विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स या ठिकाणी होणार आहे.


२१ वर्षानंतर क्रीडा महोत्सवाचा बहुमान

१९९७ मध्ये प्रथमच मुंबई विद्यापीठाला क्रीडा महोत्सव भरवण्याचा बहुमान मिळाला होता. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनंतर मुंबईने या महोत्सवाचं यजमान पद भूषवल्याने ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे, असं मत क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे प्रभारी संचालक डॉ. उत्तम केंद्रे यांनी व्यक्त केलं.हेही वाचा -

प्लास्टिकला आळा घालण्यासाठी भव्य रॅली

शालेय विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटपसंबंधित विषय
ताज्या बातम्या