Advertisement

प्लास्टिकला आळा घालण्यासाठी भव्य रॅली

काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वापरण्यात येत आहे. याला आळा बसावा या उद्देशाने मंगळवारी टाटा पॉवरच्या क्लब एनर्जीतर्फे भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं

प्लास्टिकला आळा घालण्यासाठी भव्य रॅली
SHARES

पर्यावरणाच्या हानीसाठी कारणीभूत असणाऱ्या प्लास्टिकवर राज्य सरकारने गेल्या वर्षापासून बंदी घातली आहे. यानंतर मुंबईकरांनी प्लास्टिकचा वापर कमी केला असला, तरीही अद्याप काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वापरण्यात येत आहे. याला आळा बसावा या उद्देशाने मंगळवारी टाटा पॉवरच्या क्लब एनर्जीतर्फे भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात कुर्ल्यातील सीईएस मायकेल स्कूलसह विविध १५ शाळांमधील ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.


या रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी ‘प्लास्टिकला नाही म्हणा’ आणि पर्यावरणाचं संवर्धन करण्याचं आवाहन केलं. शाळेच्या परिसरातील दुकानदार, फेरीवाले आणि उपस्थित लोकांमध्ये जनजागृती करत त्यांना प्लास्टिक उत्पादनांचा वापर टाळण्यास सांगितलं. ऊर्जा व पर्यावरण संवर्धनाच्या थीमवर आधारित या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी नागरिकांना कार्सिनोजेनिक प्लास्टिकचा वापर कमी करण्यास सांगितलं.



एक पर्यावरणदृष्ट्या जबाबदार संस्था म्हणून आम्ही भावी तरूण पिढीला ऊर्जा व संसाधन संवर्धनाबाबत जागरूक करत स्थायी भविष्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा रॅलीच्या माध्यमातून आम्ही नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करत असून, देशात सुरक्षित स्वच्छ व आरोग्यदायी पर्यावरणाला चालना देण्याचं काम नेहमीच करू.

शालिनी सिंग, कॉर्पोरेट कम्युानिकेशन्स व सस्टेनेबिलिटी, टाटा पॉवर



हेही वाचा -

मध्य रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसला २ अतिरिक्त एसी-3 टियर कोच

मुंबईतल्या गल्ल्यांमध्ये फिरणार सायकल रुग्णवाहिका



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा