Advertisement

IPLसाठी कायपण! बीसीसीआयनं रद्द केली भारतीय संघाची मालिका

आयपीएलसाठी बीसीसीआय कायपण करू शकतं हे पुन्हा एकदा बीसीसीआयनं दाखवून दिलं आहे. आयपीएल स्पर्धा व्हावी बीसीसीआयनं मोठा निर्णय घेतला आहे.

IPLसाठी कायपण! बीसीसीआयनं रद्द केली भारतीय संघाची मालिका
SHARES

आयपीएलसाठी (IPL 2021) बीसीसीआय कायपण करू शकतं हे पुन्हा एकदा बीसीसीआयनं दाखवून दिलं आहे. आयपीएल स्पर्धा व्हावी बीसीसीआयनं मोठा निर्णय घेतला आहे. भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सप्टेंबरमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार होती. ही मालिका रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे.

कोरोना व्हायरसमुळं स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलचा १४वा हंगाम पुन्हा सुरू करण्यासाठी बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएल २०२१ मध्ये अद्याप ३१ लढती हव्याच्या आहेत. यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची मालिका रद्द केली आहे.

आयपीएलमधीर उर्वरित लढती २२ दिवसात पूर्ण करण्याचं बीसीसीआयचं लक्ष्य आहे. आयपीएलचा हंगाम १९ किंवा २० सप्टेंबरला पुन्हा युएईमध्ये सुरू होऊ शकतो. ज्यात १० डबल हेडर असतील. मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलची फायनलल ९ किंवा १० ऑक्टोबर रोजी होऊ शकते. ३१ लढतीसाठी ३ आठवड्यांचा कालावधी पुरेसा आहे.

आयपीएलचं आयोजन करणं हे बीसीसीआय, संघ मालक आणि प्रसारणकर्ते या सर्वांच्या दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे. आयपीएलच्या बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानं बीसीसीआयनं ही स्पर्धा ४ मे रोजी स्थगित केली होती. २० सप्टेंबर रोजी आयपीएलला पुन्हा सुरूवात होऊ शकते आणि १० ऑक्टोबर रोजी फायनल लढत खेळवली जाऊ शकते. या कार्यक्रमाला अंतिम स्वरुप देण्याचं काम सुरू आहे.

१० दिवस डबल हेडर असेल. तर ७ दिवस फक्त एक मॅच होईल. त्या शिवाय २ क्वालिफायर, १ एलिमिनेटर आणि १ फायनल अशा ४ लढती होतील. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका ही भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या तयारीचा भाग होता. बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले की, ही मालिका आता होणार नाही. तसेही आयपीएल सारख्या स्पर्धेत खेळल्यामुळे टी-२० वर्ल्डकपची अधिक चांगली तयारी होऊ शकते. आयपीएल संपल्यानंतर एका आठवड्यात किंवा १० दिवसात टी-२० वर्ल्डकप सुरू होईल. आफ्रिकेविरुद्ध होणारी मालिका नंतर खेळवली जाऊ शकते. भारत पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे तेव्हा अतिरिक्त सामने खेळवले जाऊ शकतात.

भारताचा इंग्लंड दौरा १४ सप्टेंबर रोजी संपणार आहे. हनुमा विहारी आणि अभिमन्यू ईश्वरन यांना वगळता अन्य खेळाडू चार्टर्ड विमानातून एका बायो बबलमधून दुसऱ्या बाबो बबलमध्ये येतील. इंग्लंडचे जे खेळाडू उपलब्ध असतील ते देखील मॅनचेस्टरमधून दुबईत दाखल होतील. त्या बरोबर वेस्ट इंडिजचे खेळाडू कॅरेबियन प्रीमिअर लीग खेळून दुबईत येतील. या सर्वांना ३ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करावा लागले.



हेही वाचा -

हार्डवेअर, छत्र्या-रेनकोटची दुकानं सुरू राहणार, राज्य सरकारचा निर्णय

MPSC पोलीस उपनिरीक्षक भरतीतील शारीरिक परीक्षेच्या निकषांमध्ये बदल


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा