Advertisement

रो'हिट'मॅनच्या भारतीय संघानं घडवला 'हा' इतिहास


रो'हिट'मॅनच्या भारतीय संघानं घडवला 'हा' इतिहास
SHARES

बांग्लादेश विरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारतीय संघानं दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या ८५ धावांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर भारतीय संघानं दुसऱ्या टी-२० सामन्यात पुनरागमन केलं. बांगलादेशनं विजयासाठी दिलेलं १५४ धावांचं आव्हान भारतानं पूर्ण केलं. या सामन्यात रोहित शर्मानं ६ चौकार आणि ६ षटकार मारत ८५ धावा केल्या.

भारतीय संघाचा विक्रम

बांग्लादेश विरुद्धचा हा सामना विजयी होताचं भारतीय संघानं विक्रम करत ऑस्ट्रेलियाला मागे टाकलं आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला हा ४१ वा विजय ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियानं धावांचा पाठलाग करताना ४० सामना जिंकले आहेत. भारताने या निकषात ऑस्ट्रेलियावर नुसती मात केली नसून त्यांच्या विजयाची टक्केवारी ही ऑस्ट्रेलियापेक्षा सरस आहे.

हेही वाचा - आयपीएलमध्ये 'या' निर्णयासाठी विशेष पंच

११८ धावांची भागीदारी

रोहित शर्माला शिखर धवननं ३१ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. या मालिकेतला अखेरचा सामना १० तारखेला नागपूरच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. त्यामुळं ३ सामन्यांची ही मालिका कोण जिंकणार याकडं सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.हेही वाचा -

निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचं निधन

बेस्टमध्ये सौरऊर्जेचा वापर होण्यासाठी आॅनलाइन याचिकाRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा