SHARE

मुंबईत दुसऱ्या क्रमांकाची लाइफलाइन असलेल्या बेस्टनं विद्युत बस आणून शहरातील वायुप्रदूषण कमी करण्याच्या दिशेनं पाऊल टाकली आहेत. मात्र, प्रदुषणाच्या बाबतीत दिल्लीमधीत रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. त्यामुळं अशी परिस्थिती मुंबईत उद्भवू नये यासाठी बेस्टसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सौरऊर्जेचा वापर व्हावा या मागणीसाठी वातावरण फाउंडेशननं आॅनलाइन याचिका केली आहे.

श्वास घेण्यास त्रास

दिल्लीमध्ये हवा प्रदूषणाची भयावह स्थिती आहे. रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. शाळा, कार्यालये बंद ठेवावी लागत आहेत. दरम्यान, बेस्ट बस पूर्णपणे सौरऊर्जेवर आधारित करण्यासाठी एका तासाचा वेळ आवश्यक आहे. त्यामुळं मुंबईकरांना स्वच्छ आणि आरोग्यदायी भविष्य मिळेल. वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या वायूचे प्रमाण घटेल. सौरऊर्जेवर आधारित बसमुळं मुंबईकरांना शाश्वत भविष्य मिळेल, असं वातावरण फाउंडेशनचं म्हणणं आहे.

हेही वाचा - बेस्टचं तिकीट भाडं वाढणार नाही, प्रवाशांना दिलासा

५६ टक्क्यांनी वाढ

वातावरण फाउंडेशननं आॅनलाइन केलेल्या या याचिकेत मुंबईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत नसल्यामुळं मागील ५ वर्षांत खाजगी वाहनांमध्ये ५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या वायूमुळं मुंबईतील हवेचा दर्जा खालावत आहे. मुंबईत दुसऱ्या क्रमांकाची लाइफलाइन असलेल्या बेस्टनं विद्युत बस आणून शहरातील वायुप्रदूषण कमी करण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे. सोयीची आणि आर्थिक दृष्टीनं परवडणारी बेस्ट ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा आहे.

हेही वाचा - अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळाला बोनस

वायुप्रदूषणाची समस्या

राज्यभरात वायुप्रदूषणाची समस्या असून, देशातील जास्त प्रदूषण असलेल्या शहरांमधील १८ शहरे महाराष्ट्रातील आहेत. बेस्टने विद्युत बस आणून शहरातील वायुप्रदूषण कमी करण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे. विद्युत बसचं चार्जिंग कोळशावर अवलंबून आहे. त्यामुळं आपण हवा प्रदूषणावर अंकुश ठेवू शकत नाही. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं उत्सर्जन न करणाऱ्या सौरऊर्जेचा वापर करायला हवा, असं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे.हेही वाचा -

एसटी कर्मचाऱ्यांची वेतनकपात होण्याची शक्यता

भाज्यांच्या दरामध्ये दुपटीनं वाढसंबंधित विषय
ताज्या बातम्या