Advertisement

'आयपीएल'ला कोरोना व्हायरसचा धोका?

कोरोना व्हायरसचा फटका आता इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) वर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'आयपीएल'ला कोरोना व्हायरसचा धोका?
SHARES

संपूर्ण जगभरात खळबळ उडवणाऱ्या करोना व्हायरसमुळे मुंबई विमानतळावर परदेशी पर्यटकांची तपासणी केली जात आहे. असं असताना हळुहळु या व्हायरसचं संकट देशावर येत आहे. त्यामुळं सर्व नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या व्हायरसचा फटका आता इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) वर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सदस्य आणि आयपीएलच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य बृजेश पटेल यांनी स्पर्धेला करोना व्हायरसपासून कोणताही धोका नसल्याचं म्हटलं आहे.

संपूर्ण जगभरात खळबळ उडवणाऱ्या करोना व्हायरसमुळे ऑलिम्पिक सारख्या सर्वोच्च क्रीडा स्पर्धेवर अनिश्चितचे सावट निर्माण केले आहे. या व्हायरसमुळे अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. चीनमधून हा व्हायरस आता जगभरात पसरत चालला आहे. अशातच या महिन्याच्या अखेरीस सुरूवात होणाऱ्या आयपीएल स्पर्धेवर करोनाचा काही परिणाम होईल का अशी शंका व्यक्त केली जात आहे.

'आयपीएलला करोनापासून कोणताही धोका नाही. आम्ही सर्व गोष्टींवर नजर ठेऊन आहोत. कोणत्याही खेळाडूला धोका नाही’, असं पटेल यांनी म्हटलं आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामाची सुरूवात २९ मार्च पासून मुंबईत होत आहे. विद्यमान विजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिली लढत होत आहे. तर अंतिम सामना २४ मे रोजी मुंबईतच होईल.

बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीनं देखील करोनाचा कोणताही धोका भारतात नाही, असं म्हटलं. दरम्यान कालच इंग्लंडचा कर्णधार जो रूट यांना सांगितले की, त्यांच्या संघातील खेळाडू श्रीलंका दौऱ्यात अन्य खेळाडूंशी हस्तांदोलन करणार नाहीत. इंग्लंडच्या खेळाडूंना करोना व्हायरसचा धोका असल्यानं खेळाडू श्रीलंका दौऱ्यात दुसऱ्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणार नसल्याचं रूट यानं म्हटलं.

इंग्लंडचा संघ २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याआधी रूटला कोरोना व्हायरस संदर्भात एक प्रश्न विचारला त्यावर बोलताना तो म्हणाला, हस्तांदोलन करण्याऐवजी आम्ही एकमेकांना अभिवादन करू. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात इंग्लंडचे अनेक खेळाडू आजारी पडले होते. अनेकांना ताप आणि पोटदुखीचा सामना करावा लागला होता.हेही वाचा -

मुंबई विमानतळावर आतापर्यंत ५५१ विमानांमधून ६५,६२१ प्रवाशांची तपासणी

महाराष्ट्रात एकही करोनाग्रस्त रुग्ण नाही, आरोग्यमंत्र्यांची माहितीसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा