Advertisement

जश-अायुषच्या द्विशतकी भागीदारीने कांदिवली केंद्राचा विजय


जश-अायुषच्या द्विशतकी भागीदारीने कांदिवली केंद्राचा विजय
SHARES

जश गानिगा अाणि अायुष जेठवा यांच्या २६९ धावांच्या भागीदारीमुळे कांदिवली केंद्राने माटुंगा केंद्रावर डावाने विजय मिळवला. न्यू हिंद स्पोर्टिग क्लब आयोजित २८व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीतील दुसऱ्या सामन्यात कांदिवली केंद्राने केव्हिन चिंतानिया अाणि सूर्यांश शेडगे यांच्या भेदक गोलंदाजीमुळे माटुंगा केंद्राचा डाव ४२ धावांवर संपुष्टात अाणला. त्यानंतर जश गानिगाने नाबाद १५० धावांची तर अायुषने नाबाद १३२ धावांची खेळी करत कांदिवली केंद्राने अापला डाव १ बाद ३४९ धावांवर घोषित केला. जश गनिगाचे हे सलग दुसरे शतक ठरले. त्यानंतरही माटुंगा केंद्राला ८७ धावांवर गुंडाळत कांदिवली केंद्राने विजय साकारला.



वेदांत गडियाचे द्विशतक

यावर्षीच्या कल्पेश कोळी स्पर्धेत द्विशतक ठोकण्याचा मान गोरेगाव केंद्राच्या वेदांत गडियाने (नाबाद २०३) मिळविला. गोरेगांव केंद्राने प्रथम फलंदाजी करताना १ बाद ३२६ धावा उभारल्या. यात सर्वाधिक वाटा होता तो वेदांत गडियाचा. त्याने नाबाद २०३ धावांची खेळी साकारली. मोक्षद वंजारीने ८२ धावा फटकावत त्याला चांगली साथ दिली. मात्र त्यानंतर डहाणू-चिंचणी केंद्राला ९ बाद ९७ धावाच करता अाल्या. 



विरार-पालघर केंद्राची अागेकूच

प्रिन्सली परेरा (७९), अोंकार मळेकर (७१) मयांक टेअोटिया (६०) यांच्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर विरार-पालघर केंद्राने अापला पहिला डाव ७ बाद ३५४ धावांवर घोषित केला. वांद्रे केंद्राच्या शुभम खरात याने ६ विकेट्स मिळवण्याची करामत केली. मात्र वांद्रे केंद्राला पहिल्या डावात ८१ अाणि दुसऱ्या डावात ८ बाद १३८ धावाच करता अाल्याने विरार-पालघर केंद्राने विजय मिळवला. विरार-पालघरच्या अमन तिवारीने सामन्यात नऊ विकेट्स मिळवले.


हेही वाचा -

पडद्यामागचे पाठीराखे खूपच महत्त्वाचे - जेमिमा रॉड्रिग्ज

कल्पेश कोळी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा ५ मेपासून

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा