Advertisement

जतीन परांजपे यांचा एमसीएच्या निवड समितीचा राजीनामा


जतीन परांजपे यांचा एमसीएच्या निवड समितीचा राजीनामा
SHARES

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीअाय) जतीन परांजपे यांच्यासहित गगन खोडा यांची राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली अाहे. त्यामुळे मुंबईचा माजी क्रिकेटपटू जतीन परांजपे याने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवड समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला अाहे. राष्ट्रीय निवड समिती सदस्याने कोणत्याही राज्याच्या निवड समितीचा भाग असू नये, या लोढा समितीच्या शिफारशींनुसार परांजपे यांना एमसीएच्या निवड समितीचा राजीनामा द्यावा लागला अाहे. जतीन परांजपे भारताकडून चार वनडे सामने खेळला अाहे.


लोढा समितीचा बडगा

राष्ट्रीय निवड समितीत फक्त माजी कसोटीपटूंनाच स्थान देण्यात यावे, अशी शिफारस लोढा समितीने जानेवारी महिन्यात केली होती. त्यामुळे जतीन परांजपे यांच्यासहित गगन खोडा यांना राष्ट्रीय निवड समितीतून बाहेर जावे लागले होते. पण राष्ट्रीय निवड समितीत पाच खेळाडूंचा समावेश असावा, अशी मागणी बीसीसीअायने सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केली असून अाता सिनियर, ज्युनियर अाणि महिला संघांच्या निवड समितीत पाच सदस्यांचा समावेश असेल.


बदली सदस्याची मागणी

अजित अागरकरच्या अध्यक्षतेखालील मुंबई रणजी संघाच्या निवड समितीत भारताचा माजी डावखुरा फिरकीपटू निलेश कुलकर्णी अाणि सुनील मोरे यांचा समावेश अाहे. एमसीएच्या प्रशासकीय समितीने परांजपेच्या जागी बदली सदस्याची नियुक्ती करण्यात यावी, याबाबत क्रिकेट सुधार समितीला (सीअायसी) विनंती केली अाहे.


हेही वाचा -

अजित अागरकरची निवड समितीतून हकालपट्टी?

अखेर एमसीएने दिला 'त्या’ खेळाडूंना न्याय



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा