Advertisement

म्हणून टीम इंडियातून के. एल. राहुलला डच्चू!

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

म्हणून टीम इंडियातून के. एल. राहुलला डच्चू!
SHARES

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या

कसोटीसाठी भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. मागील अनेक सामन्यांमध्ये संधी मिळुनही खराब कामगिरी

केल्यानं फलंदाज के.एल. राहुल याला डच्चू देण्यात आला आहे. तसंच, रोहित शर्मानं संघात पुनरागमन केलं आहे. त्याशिवाय,

शुभमन गिलला संघात स्थान देण्यात आलं आहे.

रोहितचं पुनरागमन


रोहित शर्मा, शुभमन गिल याच्यासह मयंक अग्रवाल, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत

बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. कसोटी संघात पुनरागमन केलेल्या रोहित शर्माला

सलामीवीर म्हणून खेळवलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकेश राहुल याला संघातून वगळ्याची जास्त होती.


कसोटी सामन्यांची मालिका

२ ऑक्टोबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार असून, याचा पहिला सामना विशाखापट्टनम इथं खेळवण्यात येणार आहे. तसंच, १० ऑक्टोबरपासून दुसरा सामना पुण्यात , तर १९ ऑक्टोबरपासून तिसरा सामना रांची इथं खेळवण्यात येणार आहे. ही कसोटी मालिका 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप'अंतर्गत खेळवण्यात येणार आहे. या मालिकेनंतर टी-२० मालिकाही खेळवली जाणार आहे.

भारतीय कसोटी संघः 

विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि शुभनम गिल.



हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: तब्बल २१ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन

स्वरांगी मराठे बनलीय लवंगी बाई



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा