गणेशोत्सव २०१९: तब्बल २१ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन

'नवसाला पावणारा' अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचं तब्बल २१ तासांच्या मिरवणुकीनंतर विसर्जन झालं आहे.

SHARE

'नवसाला पावणारा' अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचं तब्बल २१ तासांच्या मिरवणुकीनंतर विसर्जन झालं आहे. जल्लोषात आणि ढोलताशांच्या गजरात नाचत-गाजत राजाला निरोप देण्यात आला. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमाराला 'लालबागच्या राजा'चं गिरगावच्या समुद्रात शाही विसर्जन करण्यात आलं. अखेरची आरती घेऊन बाप्पाला गिरगाव चौपाटीच्या खोल समुद्रात निरोप देण्यात आला. 'गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...'च्या गजरात लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला.

विसर्जनासाठी मार्गस्थ

अनंत चतुर्दशीला लालबागचा राजा गुरुवारी सकाळी ११ वाजताच्याया सुमारास विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. पारंपारिक वेषात भाविकांनी या मिरवणुकीत भाग घेतला. दरवर्षी प्रमाणं अत्यंत शिस्तबद्धपणे निघालेल्या या मिरवणुकीचं फुले वाहून ठिकठिकाणी स्वागत आणि पूजा करण्यात आली. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. ज्या ज्या मार्गावरून लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली त्या रस्त्यावर हारांच्या माळी घालण्यात आल्या आणि पुष्पवृष्ठी करण्यात आली.

शेवटचं दर्शन

मुंबईची शान असलेला लालबागचा राजा गुरूवारी पहाटे गिरगाव चौपाटीवर पोहोचला. त्यावेळी बाप्पाच्या शेवटचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी खास लिफ्टसारखा 'तराफा' आणण्यात आला होता. हा तराफा पाण्यात खेचून नेला आणि राजाचं विसर्जन केलं.हेही वाचा -

सुप्रिया सुळे टॅक्सी चालकावर संतापल्या अन् म्हणाल्या...
संबंधित विषय
ताज्या बातम्या