Advertisement

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी लालचंद राजपूत यांचा अर्ज

माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत (Lalchand rajput) यांनी मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केला आहे.

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी लालचंद राजपूत यांचा अर्ज
SHARES

भारतीय क्रिकेट संघाचे (Indian cricket team) मुख्य प्रशिक्षक (Head coach) रवी शास्त्री (Ravi shastri) आणि माजी अष्टपैलू खेळाडू रॉबिन सिंह (Robin singh) यांच्यात प्रशिक्षक पदावरून वाद सुरू आहेत. अशातच आता माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत (Lalchand rajput) यांनी मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केला आहेलालचंद राजपूत यांनी मंगळवारी आपला अर्ज दाखल केला आहे. याआधी त्यांनी अफगाणिस्तान (Afghanistan national cricket team) आणि झिम्बाब्वे (zimbabwe cricket team) या २ संघाचे प्रशिक्षकपद भूषवलं होतं.

नव्या प्रशिक्षकाचा शोध

भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत (World cup 2019) न्यूझीलंड (new zealand) संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) नव्या प्रशिक्षकाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. त्यासाठी जाहिरात देऊन अर्ज मागवण्यात आले आहेत. दरम्यान, बीसीसीआयनं (BCCI) वेस्ट इंडिज (west indies) दौऱ्यापर्यंत प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कोचिंग स्टाफचा कार्यकाळ वाढवला आहे.

अर्ज दाखल

भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू रॉबिन सिंह यांनी मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज दाखल केला आहे तर प्रवीण आमरे यांनी फलंदाजीच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर आता लालचंद राजपूत यांनी अर्ज दाखल केला आहे.

विनिपेग हॉक्स संघाचे कोच

या वर्षाच्या मे महिन्यापासून लालचंद राजपूत हे झिम्बाब्वे क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. परंतु, क्रिकेटमध्ये राजकारणाचा शिरकाव वाढल्यानं आयसीसीनं (ICC) झिम्बाब्वे क्रिकेट संघाला निलंबित केलं आहे. राजपूत सध्या कॅनडामध्ये सुरू असलेल्या ग्लोबल टी-२० (T-20) लीगमध्ये विनिपेग हॉक्स संघाचे कोच म्हणून काम पाहत आहेत.



हेही वाचा -

शिवसेनेसोबतच लढणार, येत्या १५ दिवसांत जागावाटपाचा निर्णय- मुख्यमंत्री

CCDचे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू, नदीत सापडला मृतदेह



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा