Advertisement

नव्या स्ट्रेनचा परिणाम वानखेडेतल्या Ind Vs NZ मॅचवर, 'हा' नियम लागू

भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवार, ३ डिसेंबर ते मंगळवार, ७ डिसेंबरला होणार आहे.

नव्या स्ट्रेनचा परिणाम वानखेडेतल्या Ind Vs NZ मॅचवर, 'हा' नियम लागू
SHARES

भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवार, ३ डिसेंबर ते मंगळवार, ७ डिसेंबरपर्यंत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर केवळ २५% गर्दीची परवानगी असेल, अशी नोटीस महाराष्ट्र सरकारनं जाहीर केली आहे.

मुंबई आणि राज्यात कोविड-१९चे रुग्ण कमी होत असले तरी दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉन या नवीन कोरोनाव्हायरस प्रकाराबाबत सतर्कता बाळगली जात आहे. स्टेडियमची क्षमता सुमारे ३३,००० आहे आणि आता फक्त ८,५०० प्रेक्षक बसू शकतील.

ही बातमी चाहत्यांसाठी निराशाजनक ठरू शकते. कारण ५ वर्षांनंतर मुंबई कसोटी सामन्याचं आयोजन करत आहे. शेवटचा कसोटी सामना वानखेडेवर २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला गेला होता.

राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागानं शनिवारी जाहीर केलेल्या आदेशात असं म्हटलं आहे आहे की, मोकळ्या जागेत, जागेच्या क्षमतेच्या २५% पर्यंत लोकांना परवानगी दिली जाईल.

त्यात पुढे असंही म्हटलं की संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) कडे औपचारिकपणे (जसे की स्टेडियम) घोषित न केल्यास अशा ठिकाणांच्या बाबतीत क्षमता ठरवण्याचा अधिकार असेल.

मैदानावरील खेळाडू, अधिकारी आणि प्रेक्षक यांना संपूर्ण लसीकरण करावे लागेल आणि त्यांना सर्व वेळ मास्क घालावा लागेल. तसंच त्यांना सामाजिक अंतर पाळावं लागेल.

यापूर्वी, एमसीएच्या सूत्रांनी एएनआय एजन्सीला पुष्टी केली होती की, राज्य सरकारनं त्यांना दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी १००% क्षमता ठेवण्याची परवानगी दिली होती. तथापि, नव्या स्ट्रेनमुळे, फक्त २५% क्षमता असेल आणि MCA आता तिकीटांची विक्री सुरू करू शकेल, असं नमूद केलं आहे.हेही वाचा

भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची निवड

'त्या' घड्याळाची किंमत १.५ कोटी रुपये...; हार्दिक पंड्याचा खुलासा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा