Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

जुहू हिरोजची पहिल्यावहिल्या एमएमपीएल चषकाला गवसणी


जुहू हिरोजची पहिल्यावहिल्या एमएमपीएल चषकाला गवसणी
SHARES

जुहू हिरोज अाणि पॅराडिगम बोरीवली वाॅरियर्स या गटसाखळीतील दोन अव्वल संघांमध्ये रंगलेला अंतिम सामना... प्रथम फलंदाजी करताना बोरीवली वाॅरियर्सची उडालेली घसरगुंडी... लवेश मेहरा अाणि निकेत कोरगावकरने दिलेली कडवी झुंज... बोरीवली वाॅरियर्सने २० षटकांत ८ बाद १५७ धावांपर्यंत मारलेली मजल... लक्ष्य गाठताना जुहू हिरोजच्या अाघाडीच्या फलंदाजांनी पत्करलेली शरणागती... प्रतिक पाटील अाणि सागर घाडीगावकर यांच्या खांद्यावर येऊन पडलेली जबाबदारी... पण न डगमगता, सर्व संकटांचा सामना करत प्रतिक पाटील अाणि सागर यांनी चौथ्या विकेटसाठी १३४ धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यांच्या या भन्नाट कामगिरीमुळे जुहू हिरोजने पहिल्यावहिल्या साई- मुंबई मास्टर्स प्रीमिअर लीग (एमएमपीएल) चषकाला गवसणी घातली.


बोरीवली वाॅरियर्सची खराब सुरुवात

पॅराडिगम बोरीवली वाॅरियर्स अाणि जुहू हिरोज यांच्यात मरीन ड्राइव्ह येथील पोलीस जिमखान्यावर शनिवारी रंगलेला अंतिम सामना चाहत्यांना थरारक क्षणांची अनुभूती देणारा ठरला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वाॅरियर्सची सुरुवात मात्र खराब झाली. विनोद एल. अाणि प्रतिक संघवी यांच्या रूपाने बोरीवली वाॅरियर्सला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. त्यानंतर शाहिन मेस्त्री अाणि निकेत कोरगावकर यांनी डाव सावरत तिसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भर घातली. लवेश मेहराने २० चेंडूंत ३ चौकार अाणि ४ षटकारांची अातषबाजी करत वाॅरियर्सचा डाव सुस्थितीत अाणला. त्यामुळे बोरीवली वाॅरियर्सला सन्मानजनक १५७ धावा उभारता अाल्या. जुहू हिरोजकडून निकेश पटणीने चार विकेट्स मिळवल्या.


प्रतिक पाटीलची झुंज यशस्वी

१५८ धावांचे अाव्हान गाठताना जुहू हिरोजने पहिल्या पाच षटकांतच तीन विकेट्स गमावल्या, त्यामुळे बोरीवली वाॅरियर्सने सामन्यावर पूर्णपणे पकड मिळवली होती. मात्र एमएमपीएलमधील पहिलं शतक ठोकण्याचा मान मिळवणारा प्रतिक पाटील मैदानावर उभा असल्यामुळे जुहू हिरोजच्या विजेतेपदाच्या अाशा कायम होत्या. प्रतिक पाटीलने अापल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत ५० चेंडूंत १४ चौकार अाणि १ षटकारासह नाबाद ८१ धावा फटकावत अापल्या संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याला चांगली साथ देताना सागर घाडीगावकरने ४१ चेंडूंत ६ चौकारांनिशी नाबाद ४७ धावा केल्या. मात्र जुहू हिरोजला मुंबई मास्टर्स प्रीमिअर लीगचे जेतेपद मिळवून देणारा प्रतिक पाटील अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा