Advertisement

शिल्ड क्रिकेट टुर्नामेंटमध्ये कोणत्या दिग्गज खेळाडूंचा समावेश? वाचा


SHARES

मुंबई पोलीस जिमखान्यातर्फे आयोजित शिल्ड क्रिकेट टुर्नामेंटचे उद्घाटन शनिवारी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवाजी पार्क जिमखाना, वरळी स्पोर्टस क्लब आणि इतर जिमखान्यातील सदस्य देखील उपस्थित होते. ही स्पर्धा मरीन ड्राईव्ह येथील पोलीस जिमखाना येथे खेळवण्यात येत आहे.



स्पर्धेत 16 संघांचा समावेश

या स्पर्धेत एकूण 16 संघाचा समावेश आहे. या संघाचे विभाजन चार ग्रुपमध्ये करण्यात आले आहे. मुंबईतील नामांकीत संघासह, रणजी आणि राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या अनेक खेळाडूंचा देखील या स्पर्धेत समावेश आहे. ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या नव्या नियमानुसार खेळवण्यात येत आहे.


येथे क्रिकेटप्रेमींनाही दिले जाते प्रशिक्षण

पहिला सामना मुंबई पोलीस विरुद्ध जैन इरिगेशन यांच्यात खेळवला जाणार आहे. गेले ७० वर्षे मुंबई पोलीस जिमखान्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. आतापर्यंत या जिमखान्यामधून अजित वाडेकर, सचिन तेडुंलकर आणि विनोद कांबळी यांसारखे खेळाडू खेळले आहेत. विशेष म्हणेज या पोलीस जिमखान्यातर्फे पोलिसांच्या मुलांसाठीदेखील क्रिकेटचे मोफत प्रशिक्षण अकादमी सुरू केल्या आहेत. पोलीस विभागातील क्रिकेटप्रेमींना देखील येथे प्रशिक्षण दिले जाते.


संघ खालीलप्रमाणे-

मुंबई पोलीस, एमसीए कोल्ट्स, जैन इरीगेशन, पारसी जिमखाना, पी. जे. हिंदू जिमखाना, इस्लाम जिमखाना, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, बॉम्बे जिमखाना, पय्याडे स्पोर्टस क्लब, डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स असोसिएशन, परखोफेने क्रिकेटर्स, दादर युनियन स्पोर्टिंग क्लब, सींद स्पोर्टिंग क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब, न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब, कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशन



हेही वाचा - 

मुंबईत रंगणार ब्लाइंड क्रिकेट स्पर्धा

मुंबईकर श्रेयस अय्यरची सचिन तेंडुलकरच्या विक्रमासोबत बरोबरी


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा