Advertisement

मुंबईकर अजित आगरकरचा 'या' पदासाठीचा अर्ज फेटाळला

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समिती प्रमुख पदाच्या शर्यतीत मुंबईकर आणि संघाचा माजी खेळाडू अजित आगरकर अयशस्वी ठरला आहे.

मुंबईकर अजित आगरकरचा 'या' पदासाठीचा अर्ज फेटाळला
SHARES

भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) निवड समिती (Selection Committee) प्रमुख पदाच्या शर्यतीत मुंबईकर आणि संघाचा माजी खेळाडू अजित आगरकर (Ajit Agarkar) अयशस्वी ठरला आहे. या पदासाठी भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad), समालोचक व माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन (V.V.S. Laksman) आणि माजी फिरकीपटू सुनील जोशी (Sunil Joshi) यांची नावे अंतिम ३ मध्ये निवडण्यात आली आहेत. त्यामुळं आता या तिघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे.

या मुलाखतींसाठी (Interview) ४४ जणांनी अर्ज केला होता. त्यापैकी व्यंकटेश प्रसाद, लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि सुनील जोशी यांची नावे अंतिम ३ मध्ये निवडण्यात आली आहेत. सध्याचे निवड समिती प्रमुख एम.एस.के. प्रसाद आणि सदस्य गगन खोडा यांच्या जागी नवीन भरती करण्यात येणार आहे.

एम.एस.के. प्रसाद हे निवड समितीत दक्षिण झोनचे (South Zone) तर गगन खोडा हे मध्य झोनचे (Central Zone) प्रतिनिधित्व करत होते. त्यामुळे आता दक्षिण झोनमधून व्यंकटेश प्रसाद, शिवरामकृष्णन आणि सुनील जोशी यांची नावं अंतिम यादीत घेण्यात आली आहेत. तसंच, मध्य झोनमधून राजेश चौहान आणि हरविंदर सिंग या भारताच्या माजी क्रिकेटपटूंची नावे सदस्यपदाच्या मुलाखतीसाठी देण्यात आली आहेत.

मुंबईत होणाऱ्या मुलाखतीसाठी या ५ ही माजी खेळाडूंना बोलावण्यात आलं आहे. नवीन निवड समिती (Selection Committee) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) होणाऱ्या ३ एकदिवसीय सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करणार आहे.

भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरचा अर्ज मात्र फेटाळण्यात आला. अजित आगरकर हा मुख्य दावेदारांमध्ये समजण्यात येत होता. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सध्याच्या विभागीय धोरणाला अनुसरून आगरकरची निवड केली नसल्याचं समजतं. सध्याच्या निवड समितीतील उर्वरित तीन सदस्यांचा कार्यकाळ जेव्हा संपेल, तेव्हा अजित आगरकरचा विचार करण्यात येऊ शकतो, अशी चर्चा आहे.


हेही वाचा -

जे.जे. रुग्णालयात लवकरच कॅन्सर उपचार- अमित देशमुख

मेट्रो स्थानकांची मॉल्सना थेट जोडणी?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा