Advertisement

मुंबई इंडियन्सची सनरायझर्स हैदराबादशी 'काँटे की टक्कर’


मुंबई इंडियन्सची सनरायझर्स हैदराबादशी 'काँटे की टक्कर’
SHARES

वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा विजयाचा घास ड्वेन ब्राव्होने हिरावून घेतला होता. अाता पहिल्या सामन्यातील पराभव पचवल्यानंतर गतविजेता मुंबई इंडियन्स संघ सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज झाला अाहे. मात्र गुजरात लायन्सवर नऊ विकेट्सनी विजय मिळवणाऱ्या सनरायझर्सशी लढताना मुंबई इंडियन्सला काँटे की टक्कर द्यावी लागणार अाहे.


सनरायझर्सची भन्नाट गोलंदाजी

गोलंदाजीत विविधता असलेली सनरायझर्स ही यंदाच्या अायपीएलमधील एकमेव टीम अाहे. सीम अाणि स्विंग गोलंदाजीचा मास्टर भुवनेश्वर कुमार, भन्नाट वेग असलेला बिली स्टॅनलेक अाणि सिद्धार्थ कोल त्याचबरोबर सर्वात वेगवान लेगस्पिनर अाणि गुगलीचा बादशाह राशिद खान अाणि डावखुरा फिरकीपटू शाकिब अल हसन अशी भन्नाट गोलंदाजांची फळी सनरायझर्सकडे अाहे. 


मुंबईकडे स्टार खेळाडूंची मांदियाळी

मुंबई इंडियन्स संघात स्टार खेळाडूंची मांदियाळी असली तरी अायपीएलमध्ये संथ सुरुवात करणारा अशी मुंबईची अोळख अाहे. कर्णधार रोहित शर्मा, इव्हिन लुइस, किराॅन पोलार्ड, हार्दिक पंड्या अशी फलंदाजांची तगडी फौज असली तरी सलामीच्या सामन्यात ती चमकली नव्हती. मयांक मार्कंडे याच्या रूपाने मुंबईला मात्र चांगला युवा लेगस्पिनर मिळाला अाहे. डेथ अोव्हर्समध्ये ड्वेन ब्राव्होने जसप्रीत बुमरा, मिचेल मॅकक्लेनाघन अाणि मुस्तफिझुर रहमान यांची धुलाई केली होती, ही मुंबईसाठी चिंतेची बाब म्हणावी लागेल.

सामना : सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स
ठिकाण : राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबाद
वेळ : रात्री ८ वाजल्यापासून


हेही वाचा -

मुंबई इंडियन्सला धक्का, पॅट कमिन्सची माघार

चेन्नईची ‘ब्राव्हो’ कामगिरी, मुंबईला सलामीलाच धक्का

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा