Advertisement

MI vs RCB : प्रथम सामना कधी, कुठे, केव्हा? जाणून घ्या!

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या (IPL 2021) मोसमाचं बिगुल शुक्रवारपासून वाजणार आहे.

MI vs RCB : प्रथम सामना कधी, कुठे, केव्हा? जाणून घ्या!
SHARES

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या (IPL 2021) मोसमाचं बिगुल शुक्रवारपासून वाजणार आहे. सलामीची लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रेड आर्मी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यांच्यात होणार आहे.

चेन्नईतील चिन्नास्वामी मैदानावर (MA Chidambram Stadium Chennai) खेळविण्यात येणार आहे. सलामीच्या लढतीत विजयी सलामी देऊन स्पर्धेची सुरुवात थाटात करण्यास रोहितची ब्लू आर्मी सज्ज आहे. तर दुसरीकडे आक्रमक खेळाडू्ंनी भरलेला बंगळुरु संघ मुंबईला नमवून ‘हम भी किसीसे कम नही’ हे दाखवून द्यायला तयार आहे. 

सामना कधी आणि कुठे?

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील पहिला आणि आयपीएलच्या १४ व्या पर्वातील सलामीचा सामना ९ एप्रिल रोजी चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.

सामना किती वाजता सुरु होणार?

भारतीय वेळेनुसार सामना ठीक ७.३० वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास ठीक ७ वाजता सामन्याच्या टॉस होईल.

लाईव्ह मॅच कुठे बघायला मिळेल?

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील पहिल्या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचं?

तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही बघू शकता.हेही वाचा -

जाणीवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबात चुकीच्या बातम्या का?

कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या व्यक्तींबाबत संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा