Advertisement

कोरोनामुळे मुंबई टी २० लीग पुढे ढकलली

मुंबईत कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. यामुळे मुंबई टी २० लीग मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे.

कोरोनामुळे मुंबई टी २० लीग पुढे ढकलली
SHARES

मुंबईत कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. यामुळे मुंबई टी २० लीग मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे. मुंबई लीगचे गव्हर्निंग कॉन्सिल अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी ही माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. आरोग्य यंत्रणेवर असलेला ताण आणि सगळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचं मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील आणि मुंबई प्रीमिअर लीगचे गव्हर्निंग कॉन्सिल अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी याबाबत एक पत्रक त्यांनी जारी केलं आहे. पुढील आदेश येईपर्यंत येत्या जून महिन्यात होणारी मुंबई लीग मालिका पुढे ढकलत असल्याचं या पत्रकात सांगण्यात आलं आहे. पत्रकात म्हटलं आहे की, देशातील सध्याची केरोना स्थिती पाहता सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबई क्रिकेट लीगचं ३ रं पर्व पुढे ढकलत आहोत. पुढचा निर्णय येईपर्यंत हा आदेश लागू राहील.  

बीसीसीआआयने राज्य क्रिकेट संघटनाना टी २० लीग स्पर्धा आयोजित करण्याची परवानगी बुधवारी दिली होती. आयपीएलचा १४ वा हंगाम ३० मे रोजी संपणार आहे. त्यानंतर राज्य संघटना त्यांच्या टी २० लीग स्पर्धा आयोजित करू शकते असा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. पण आता ही स्पर्धा पुढे ढकलली आहे.हेही वाचा -

आर अश्विनचा आयपीएल सोडण्याचा निर्णय, 'हे' आहे कारण

भावा तुझ्या कार्याला सलाम! ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी 'या' खेळाडूनं केली ३७ लाख रुपयांची मदत

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा