Advertisement

दुसऱ्या दिवशी रणजी सामन्यात मुंबई संघाची शानदार खेळी


दुसऱ्या दिवशी रणजी सामन्यात मुंबई संघाची शानदार खेळी
SHARES

क्रिकटच्यारणजी चषक स्पर्धेत तामिळनाडू विरुद्धच्या दुसऱ्या दिवसाअखेर मुंबई संघाने शानदार खेळ करत पुनरागमन केले. पहिल्या डावात ३७४ धावांचा डोंगर उभारलेल्या मुंबई संघाने दिवसाअखेर तामिळनाडू संघाची ५ बाद २३९ धावा करत त्यांची कोंडी केली. तामिळनाडू संघ १३५ धावांनी पिछीडवर आहेत. मुंबई खेळाडूंच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे सामन्यात पकड मिळवण्यात यश आले. हा सामना बीकेसी शरद पवार क्रिकेट अकादमी येथे खेळवण्यात आला.

या सामन्यात आकाश पारकरने ४५ चेंडूत ५ चौकार आणि एक षटकार करत ३३ धावा केल्या. त्याच्या या शानदार खेळीमुळे मुंबईला चांगलाच फायदा झाला. नंतर मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या तामिळनाडूची सुरुवात थोडी अडखळत झाली. मुंबईच्या आकाशने सुरुवातीलाच अभिनव मुकुंदला ९ धावांवर बाद करत तामिळनाडूला धक्का दिला. नंतर मुरली विजय ११, कौशिक गांधी ६ आणि विजय शंकर १८ धावांवर बाद झाले. यामुळे तामिळनाडूचा डाव ४ बाद ६९ असा होता.

मुंबईच्या मजबूत गोलंदाजीमुळे मुंबईने या सामन्यात आपले वर्चस्व राखले. पण तामिळनाडूच्या बाबा इंद्रजीतने एका बाजूने १७३ चेंडूत १२ चौकांरासह नाबाद १०५ धावांची खेळी करत संघाला मानसिक तणावातून बाहेर काढले. त्याने वॉशिंग्टन सुंदरसह अर्धशतक झळकावत पाचव्या विकेटसाठी १५७ धावांची खेळी केली. सुंदरने ९१ चेंडूत ११ चौकार आणि एक षटकारासह ६९ धावा केल्या. पण धवल कुलकर्णीने त्याला बाद करत ही भागीदारी मोडीत काढली.

या सामन्यात मुंबईच्या धवल कुरकर्णी, आकाश पारकर आणि अभिषेक नायर याने प्रत्येकी एक बळी घेतला तर विजय गोहिल याने दोन बळी घेतले.


हेही वाचा - 

अवघ्या 18 व्या वर्षात पृथ्वीचे तीन शतक


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा