Advertisement

रणजीतील मुंबई - मध्य प्रदेश सामना अनिर्णित


रणजीतील मुंबई - मध्य प्रदेश सामना अनिर्णित
SHARES

मुंबई-मध्य प्रदेशमध्ये झालेल्या रणजी सामन्यातील धिम्या खेळीमुळे हा सामना अनिर्णित राहिला. यावेळी मध्य प्रदेशने टॉस जिंकत फलंदाजी घेत पहिल्या डावात 409 धावा केल्या. तर मुंबई संघाने सोमवारी पहिला डाव खेळत 8 बाद 440 धावां करत 3 गुण निश्चित केले. 14 तारखेपासून सुरू झालेला हा सामना इंदौर येथील एमराल्ड हाइट्स आतंरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईच्या नव्या युवा खेळाडूंनी शानदार प्रदर्शन करत 31 धावांची आघाडी घेत 3 गुण आपल्या खिशात घातले.


मध्य प्रदेशचा फलंदाज नमन ओझा याने 180 धावांचा डोंगर रचत सुंदर असा खेळ करत आपल्या संघाचा दबदबा कायम राखला.
मुंबई संघाकडून कर्णधार सुर्यकुमार यादव 91, जय बिस्त 135 आणि सिद्धेश लाड 82 अशा धावा करत आघाडी घेण्यात यश मिळवले. मुंबईकडून गोलंदाजीत मिनाद मांजरेकर, रॉयस्टन डायस यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. या संपूर्ण सामन्यात नवख्या आकाश पारकरने पाच बळी घेत आपली छाप पाडली. या लढतीत मध्य प्रदेशककडून धीम्या फलंदाजीचे प्रदर्शन झाले. पण यामुळे सामना दुसऱ्या दिवसाअखेरच अनिर्णित राहिला. सामन्याच्या दुसऱ्या डावात 66 धावांतच अर्धा संघ परतल्यामुळे संघाने थोडी सावध खेळी केली.


संक्षिप्त धावफलक ;

मध्य प्रदेश (पहिला डाव) : (नमन ओझा १८०, अंकित शर्मा ६७; आकाश पारकर ४/७०) आणि (दुसरा डाव) : (अंकित शर्मा नाबाद ५२, नमन ओझा ३८; विजय गोहिल २/३०, मिनाद मांजरेकर २/३३, आकाश पारकर १/११) अनिर्णित वि. मुंबई (पहिला डाव) : (जय बिस्त १३५, सूर्यकुमार यादव ९१, सिद्धेश लाड ८२; शुभम शर्मा २/८, मिहिर हिरवानी २/१०५, अंकित शर्मा २/११९)


हेही वाचा - 

पहिल्या रणजी सामन्यात अादित्य तरेची अनुपस्थिती


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा