Advertisement

वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या वन डे साठी टीम जाहीर, ऋषभ पंतला संधी


वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या वन डे साठी टीम जाहीर, ऋषभ पंतला संधी
SHARES
Advertisement

वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या वन डे साठी निवड समितीने १२ खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर केला आहे. या खेळाडूंमध्ये विकेट किपर ऋषभ पंत याला महेंद्र सिंग धोनीच्या जोडीला निवडण्यात आलं आहे. डे नाईट खेळवण्यात येणारा हा सामना गुवाहाटी इथं होणार आहे.

वेस्ट इंडिजविरूद्धच्या नुकत्याच आटोपलेल्या टेस्ट सीरिजमध्ये ऋषभ पंतने तडाखेबंद फलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याने दोन्ही मॅचमध्ये ९० हून अधिक धावांची खेळी केली होती. त्यामुळेच दिनेश कार्तिकऐवजी त्याला वन डे मध्ये संधी देण्यात आली आहे.


धोनीला पर्याय

पुढच्या वर्षी क्रिकेट वर्ल्ड कप होणार असल्याने भविष्याच्या दृष्टीने धोनीला पर्याय म्हणून त्याला अधिकाधिक वन डे सामन्यांचा अनुभव मिळावा म्हणून त्याची निवड करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


'असा' आहे भारतीय संघ:

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अंबाती रायुडू, ऋषभ पंत, महेंद्र सिंह धोनी (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि खलील अहमदहेही वाचा-

'वन डे'त विराटचं कमबॅक, पंतलाही चान्स!

पृथ्वी शॉला मिळणार का विश्वचषकात संधी?संबंधित विषय
Advertisement