Advertisement

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रुग्णालयातून घरी परतला

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) रुग्णालयातून घरी परतला आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रुग्णालयातून घरी परतला
SHARES

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) रुग्णालयातून घरी परतला आहे. सचिनला २७ मार्च रोजी कोरोनाची लागण (Sachin Tendulkar Corona) झाली होती. मात्र, त्यानंतर सचिन तेंडुलकर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाला होता. सचिननं घरामध्ये विलगीकरणात राहणार असल्याची माहिती दिली आहे. 'थोड्यावेळापूर्वी रुग्णालयातून घरी परतलो. सध्या विलगीकरणात आराम करत आहे. सर्व चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनेसाठी त्यांचे आभार मानतो. रुग्णालयातील सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानतो', असं सचिन तेंडुलकर यांनं म्हटलं.

कोरोनाची लागण झाल्यावर तो घरातच क्वारंटाईन होता. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यांनुसार त्याच्यावर औषधोपचार सुरु होते. मात्र ट्विट करत त्याने आपण रुग्णालयात दाखल होत असल्याचं सांगितलं आहे. सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाल्यानंतर जगभरातील त्याच्या चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केल्या तसंच त्याची तब्येत लवकरात लवकर पूर्ववत व्हावी, अशा मनोकामना व्यक्त केल्या होत्या.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला २७ मार्चला कोरोनाची लागण झाली. स्वत: सचिन तेंडुलकरने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली होती. मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या, असं सचिन तेंडुलकरने म्हटलं होतं. दरम्यान, सचिन तेंडुलकरच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील कोरोना चाचणी केली असून त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.



हेही वाचा -

जाणीवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबात चुकीच्या बातम्या का?

कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या व्यक्तींबाबत संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा