Advertisement

मुंबईकर सर्फराजचं रणजीत सलग दुसरं द्विशतक

भारताचा युवा फलंदाज सर्फराज खान (sarfaraz khan) याने हिमाचल प्रदेशविरूद्धच्या (himachal pradesh) सामन्यात पहिल्याच दिवशी तडाखेबंद फलंदाजी करत सलग दुसरं द्विशतक (double century) झळकावलं आहे.

मुंबईकर सर्फराजचं रणजीत सलग दुसरं द्विशतक
SHARES

भारताचा युवा फलंदाज सर्फराज खान (sarfaraz khan) याने हिमाचल प्रदेशविरूद्धच्या (himachal pradesh) सामन्यात पहिल्याच दिवशी तडाखेबंद फलंदाजी करत सलग दुसरं द्विशतक (double century) झळकावलं आहे.   

हेही वाचा- भारतीय संघात मुंबईच्या 'या' ५ खेळाडूंचा दबदबा

रणजी स्पर्धेच्या (ranji trophy) सातव्या फेरीतील मुंबई विरूद्ध हिमाचल प्रदेश ( mumbai vs himachal pradesh) या दोन संघातील सामन्याला सोमवारपासून सुरूवात झाली. ही लढत धर्मशाळा (dharamshala) येथील स्टेडियमवर सुरू आहे. हिमाचलने टाॅस जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. पहिल्याच दिवशी मुंबईची अवस्था ४ बाद ७१ अशी झाली. पण त्यानंतर सर्फराज पुन्हा एकदा तारणहार म्हणून संघाच्या मदतीला धावून आला. त्याने १९९ चेंडूत आपलं द्विशतक पूर्ण केलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सर्फराजने २१३ चेंडूत नाबाद २२६ धावा केल्या. यात ३२ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. 

मुंबईतील वानखेडे मैदानावर (wankhede stadium) उत्तर प्रदेशविरुद्ध (uttar pradesh) झालेल्या सामन्यात सर्फराजने ३९१ चेंडूत नाबाद ३०१ धावा केल्या होत्या. त्यामुळे पहिल्या दिवशी नाबाद असलेला सर्फराज दुसऱ्या दिवशी आणखी एक त्रिशतक करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  

हेही वाचा- 'गब्बर' धवनला लागलेलं दुखापतीचं ग्रहण काही सुटेना

प्रथम श्रेणी सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्रिशतक झळकावण्याची त्याची ही तिसरी वेळ होती. याआधी रणजी ट्रॉफीच्या इतिहासात करुण नायर (karun nair) याने सहाव्या क्रमांकावर त्रिशतक झळकावण्याची कामगिरी केली होती. सर्फराजच्या आधी मुंबईकडून अखेरचे त्रिशतक रोहित शर्माने (rohit sharma) (३०९ धावा) २००९ मध्ये केलं होतं.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा