Advertisement

शार्दूल ठाकूर, हार्दिक पंड्या यांची अाशिया चषकातून माघार


शार्दूल ठाकूर, हार्दिक पंड्या यांची अाशिया चषकातून माघार
SHARES

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मैदानावरच कोसळलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याच्यासह भारताच्या अन्य दोन खेळाडूंनी अाशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली अाहे. मुंबईचा मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूर तसेच फिरकीपटू अक्षर पटेल यांनीही दुखापतीच्या कारणास्तव माघार घेतली अाहे. त्यांच्या जागी अाता भारतीय संघात दीपक चहल, सिद्धार्थ कौल अाणि रवींद्र जडेजा यांची निवड करण्यात अाली अाहे. बीसीसीअायच्या अधिकृत ट्विटर पेजवर ही माहिती देण्यात अाली अाहे.


दीपक चहरला संधी

हार्दिक पंड्याला पाठीच्या दुखण्याने त्रासले होते. त्यातच गोलंदाजी करत असताना तो मैदानावरच कोसळला. शार्दूल ठाकूर याच्याही पायाचे स्नायू ताणले गेले अाहेत. तसेच अक्षर पटेल हा बोटाच्या दुखापतीमुळे माघारी परतला अाहे. पंड्याच्या जागी दीपक चहरची निवड झाली अाहे. तो अाजच दुबईला रवाना होणार अाहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याने भारतीय संघात पदार्पण केले होते.


जडेजाचे पुनरागमन

गेल्या वर्षी जुलै महिन्यात अखेरचा वनडे सामना खेळणारा फिरकीपटू रवींद्र जडेजा पुन्हा एकदा भारतीय संघातून पुनरागमन करणार अाहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतही तो भारतीय संघात होता. मात्र त्याला अखेरच्या कसोटी सामन्यात संधी मिळाली होती. या संधीचे सोने करत त्याने सात विकेट्स अाणि नाबाद ८६ धावांची खेळीही केली होती. त्यामुळेच त्याला वनडे संघातही स्थान मिळाले अाहे.


हेही वाचा -

क्रांती साळवीची नऊवारी नेसून मॅरेथाॅनमध्ये धाव, गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद

जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिकला रौप्यपदकसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा