• शिखर धवनच्या जागी 'याला' भारतीय संघात स्थान
SHARE

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात झालेल्या मालिकेत भारतीय संघाचा फलंदाज संजू सॅमसन या खेळाडूला स्थान मिळालं नव्हतं. मात्र, येत्या डिसेंबर महिन्यात वेस्ट इंडिज विरूद्ध होणाऱ्या सामन्यात संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत खेळत असताना शिखर धवनच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे.

खेळण्याची संधी

बांग्लादेश विरुद्धच्या अंतिम संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्ध मालिकेत निवड समितीनं संजूला डावलल्यामुळं त्याच्या चाहत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. परंतु, आता शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळं संजूला आता भारतीय संघात स्थान मिळालेलं आहे.

बदलांची मालिका

भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज विरुद्द मालिकेत बदलांची मालिका सुरुच आहे. सर्वात प्रथम पहिल्या टी-२० सामन्याचं ठिकाण बदलण्यात आल्यानंतर आयसीसीनं तिसऱ्या पंचांकडं 'नो-बॉल'चा निर्णय देण्याची जबाबदारी सोपवली.

टी-२० साठी भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, संजू सॅमसन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, दिपक चहर, भुवनेश्वर कुमार.


वन-डेचा भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, संजू सॅमसन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, केदार जाधव, रविंद्र जाडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, दिपक चहर, भुवनेश्वर कुमार.हेही वाचा -

सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे रद्दीत विकले, खडसेंचा भाजपला घरचा आहेर

भाऊ बहिणीची गळाभेट, विधानसभेत सुप्रिया सुळेंनी केलं अजित पवारांचं स्वागतसंबंधित विषय
ताज्या बातम्या