Advertisement

तौंते वादळाचा मुंबईतील 'या' स्टेडियमला मोठा फटका

सध्याच्या दुर्घटनेत कोणलाही इजा झालेली नसून लवकरच त्या स्टेडियमची पुर्नबांधणी करण्यात येईल.

तौंते वादळाचा मुंबईतील 'या' स्टेडियमला मोठा फटका
SHARES

तौक्ते वादळामुळे जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यांनी सोमवारी मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमचे नुकसान केले आहे. याशिवाय वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील शरद पवार जिमखान्यालाही त्याचा फटका बसल्याची माहिती मुंबई क्रिकेट संघटनेनं (एमसीए) दिली. सोमवारी गुजरात आणि राजस्थान राज्यात प्रामुख्याने घोंघावणाऱ्या तौक्ते वादळाचे पडसाद महाराष्ट्रावरही उमटले.

मुंबईत अनेक ठिकाणी झाडं आणि घरांची हानी झाली. वाऱ्याच्या जोरदार प्रवाहामुळं वानखेडे स्टेडियममधील नॉर्थ स्टँडच्या दिशेनं असलेली १६ फूट उंचीची साइटस्क्रीन खाली कोसळली. यापूर्वी २०११च्या विश्वचषकादरम्यानही अशी घटना घडली होती. मात्र सध्याच्या दुर्घटनेत कोणलाही इजा झालेली नसून लवकरच साइटस्क्रीन पुन्हा तयार करण्यात येईल असल्याचं समजतं.

त्याशिवाय कोरोना रुग्णांच्या विलगीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅथॉलिक जिमखान्याच्या मैदानावर मुसळधार पावसामुळे सोमवारी तलाव तयार झाल्याने रुग्णांना तातडीने पहिल्या मजल्यावर नेण्यात आलं.

सोमवारी सकाळी मुंबईत अवघ्या दोन तासात १३२ झाडे उन्मळून पडली आहेत. त्यावरून तौक्ते वादळाचा तडाखा किती मोठा आहे हे दिसून येते. झाडांची पडझड: मुंबईत कालपासूनच जोराचे वारे वाहत असून पाऊसही पडत आहे. जोरदार वाऱ्यामुळे सोमवारी १६ मे रोजी मुंबईत ५० झाडे उन्मळून पडली. तर आज सकाळी ८ ते १० या दोन तासात एकूण १३२ झाडे कोसळून पडली आहेत. त्यात शहरात ५९, पूर्व उपनगर १५ आणि पश्चिम उपनगरातील ५८ झाडांचा समावेश आहे.



हेही वाचा -

चक्रीवादळानंतरही मुंबईत पावसाच्या हलक्या सरी

ठाण्यात रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल 'इतक्या' दिवसांवर


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा