Advertisement

ठाण्यात रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल 'इतक्या' दिवसांवर

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या आता घटत असल्याचं दिसून येत आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही ९५.८४ टक्क्यांवर गेलं आहे.

ठाण्यात रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल 'इतक्या' दिवसांवर
SHARES

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या आता घटत असल्याचं दिसून येत आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही ९५.८४ टक्क्यांवर गेलं आहे. तसंच रुग्ण दुपटीच्या कालावधीमध्येही मोठी वाढ झाली आहे.

ठाण्यात एका महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी ५२ दिवसांवरून ३२३ दिवसांवर पोहचला आहे. तसंच महिनाभरापूर्वी आठवड्याचा रुग्णवाढीचा वेग १.५७ टक्के होता. तो आता ०.२५ टक्क्यांवर आला आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८३ टक्क्यांवरून ९५.८४ टक्के झालं आहे.

महापालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख २६ हजार ६८७ वर गेली आहे. यापैकी १ लाख २१ हजार ४१३ रुग्ण बरे झाले आहेत.तर आतापर्यंत १८३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ठाण्यात ३ हजार ४४४ रुग्ण उपचार घेत आहेत. महिनाभरापूर्वी सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार ०५ होती. 

 फेब्रुवारी महिन्यापर्यंत कोरोना नियंत्रणात आला होता. यावेळी रुग्ण दुपटीचा कालावधी ५०० दिवसांच्या पुढे गेला होता. मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरूवात झाली.  ७ मार्चला रुग्णदुपटीचा कालावधी २५४ दिवस इझाला होता. तर १६ एप्रिलला तो ५२ दिवसांवर आला होता. आता रुग्णदुपटीचा कालावधी ३२३ दिवसांवर आला आहे. हेही वाचा - 

मुंबईच्या पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त किनारपट्टीची पाहणी

चक्रीवादळानंतरही मुंबईत पावसाच्या हलक्या सरी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा