Advertisement

'आयपीएल' दिसणार आता 'स्टार'वर, १६,३४७ कोटी रुपयांना विकत घेतले प्रक्षेपण हक्क


'आयपीएल' दिसणार आता 'स्टार'वर, १६,३४७ कोटी रुपयांना विकत घेतले प्रक्षेपण हक्क
SHARES

इंडियन प्रीमियर लिग (आयपीएल)मधील क्रिकेट मॅच प्रमाणेच या लिगच्या प्रक्षेपणाचे हक्क मिळवण्यासाठी सोनी पिक्चर्स आणि स्टार इंडियात रंगलेल्या उत्कंठावर्धक लढतीत अखेर स्टार इंडियाने सर्वाधिक बोली लावत बाजी मारली. स्टार इंडियाने १६,३४७ कोटी रुपयांची बोली लावत २०१८ ते २०२२ या पाच वर्षांसाठी 'आयपीएल'चे प्रक्षेपणाचे हक्क मिळवले.

आयपीएलच्या प्रक्षेपणाचे हक्क वितरीत करण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल क्रिकेट इन इंडिया (बीसीसीआय)ने मुंबईत मंगळवारी लिलाव पुकारला होता. या लिलावात टीव्ही आणि डिजिटल हक्कासाठी वेगवेगळी बोली पुकारण्यात आली. टीव्ही प्रक्षेपणासाठी लिलावात प्रामुख्याने सोनी पिक्चर्स आणि स्टार इंडिया एकमेकांसमोर उभे ठाकले होते. तर डिजिटल हक्कासाठी टाइम्स इंटरनेट, रिलायन्स जियो, एअरटेल आणि फेसबुकही मैदानात उतरले होते.

'बीसीसीआय' पदाधिकाऱ्यांनी चर्चेच्या अनेक फेऱ्या घेतल्यानंतर अखेर स्टार इंडियाच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार पुढील पाच (२०१८ ते २०२२) वर्षांसाठी टीव्ही प्रक्षेपणाचे हक्क स्टार इंडियाकडे राहणार आहेत. या लिलावातून २० हजार कोटी रुपये बीसीसीआयच्या तिजोरीत जमा होतील, अशी बोर्डाला अपेक्षा होती. प्रत्यक्षात त्याहून कमी रकमेवर बोर्डाला समाधान मानावे लागले. तरीही ही एक ऐतिहासिक बोली होती, असे बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी सांगितले.

ही निवड सोनी पिक्चर्ससाठी मोठा धक्का मानला जात आहे. मागील दहा वर्षांपासून सोनी पिक्चर्सकडे आयपीएलच्या टीव्ही प्रक्षेपणाचे हक्क होते. सोनी पिक्चर्सने २००८ साली ८,२०० कोटी रुपये खर्च करून हे हक्क मिळवले होते. तर २०१५ साली नोवी डिजिटलने ३०२.२ कोटी रुपयांची बोली लावत आयपीएलच्या डिजिटल प्रसारणाचे हक्क तीन वर्षांसाठी मिळवले होते.



हे देखील वाचा -

'ट्रिपल एच'नं मुंबई इंडियन्सला दिला चॅम्पियनशीप बेल्ट



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा