Advertisement

वन-डे मध्ये विराट, रोहित अव्वल; ICC ची क्रमवारी जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) आपली एकदिवसीय क्रिकेटमधील क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचं वर्चस्व राहिलं आहे.

वन-डे मध्ये विराट, रोहित अव्वल; ICC ची क्रमवारी जाहीर
SHARES

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC)  आपली एकदिवसीय क्रिकेटमधील क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचं वर्चस्व राहिलं आहे. फलंदाजांच्या यादीमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन्ही भारतीय खेळाडू पहिल्या दोन स्थानांवर आहेत. तर, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला गोलंदाजांच्या यादीत दुसरं स्थान मिळालं आहे. 

या यादीत कोहली (८७१ गुणांसह) आणि रोहित शर्मा (८५५) गुणांसह या यादीत क्रमश: प्रथम आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यानं झिम्बाब्वेविरोधातील ३ सामन्यांमध्ये २२१ धावा करत या दोन्ही खेळाडूंपासूनचं अंतर काही प्रमाणात कमी केलं. त्याला ८ रेटींग गुणांचा फायदा झाला. पण, तरीही तो तिसऱ्याच स्थानावर आहे.


झिम्बाब्वेच्या ब्रँडन टेलर आणि सीन विलियम्सला मालिकेमध्ये शतक ठोकण्याचा फायदा झाला. ज्यामुळं टेलर ९ पाय़ऱ्यांनी वर म्हणजेच ४२ व्या स्थानावर आला. 



हेही वाचा-

IPL 2020 'प्ले-ऑफ'चं वेळापत्रक; 'या' दिवशी होणार सामने



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा