चोरीच्या गुन्ह्यात ‘टिक टाॅक स्टार’ला अटक


चोरीच्या गुन्ह्यात ‘टिक टाॅक स्टार’ला अटक
SHARES

अंधेरीच्या ओशिवरा परिसरात एका माँडेलच्या घरी चोरी करणाऱ्या टिक टाँक स्टारला ओशिवरा पोलिसांनी मोट्या शिताफीने अटक केली आहे. अभिमन्यू अर्जुन गुप्ता (२८) असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी सराईत असून त्याच्यावर मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यातही विविध गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या गुप्ता हा पोलिसांच्या कस्टडीत आहे.

हेही वाचाः- मुंबईत मंगळवारी, बुधवारी १५ टक्के पाणीकपात

तक्रारदार खुशबू अगरवाल ह्या अंधेरीच्या ओशिवरा परिसरात रहात असून त्या मॉडेल आहेत १८ डिसेंबर रोजी त्यांच्या कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या. त्या २२ डिसेंबर रोजी राहत्या घरी आल्या असता त्यांना घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप दिसून आले नाही. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता. त्यांच्या घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तसेच त्यांच्या घराला लावलेले लॉक कापलेले होते. त्याच्या बाजूस लॉक कापणारी साधने मिळाली. यानंतर खुशबूने त्यांच्या लोखंडी कपाटातील सोन्याच्या दागिने व रोख रकमेची पाहणी केली असता त्यातील रुपये ४ लाख ४४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ४५ हजार असे एकूण ४ लाख ८९ हजार रुपयेची मालमत्ता चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.  त्यानुसार खुशबूने ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

हेही वाचाः- PMC Bank scam: प्रवीण राऊतशी संबंधीत ७२ कोटींच्या मालमत्तेवर टाच

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर, पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक तुषार सावंत, पोलिस हवालदार दयानंद साटम, लक्ष्मण बागवे, पोलिस नाईक विनोद माने, पोलिस शिपाई किरण बारसिंग, उमेश सोयंके, मनिष सकपाळ यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. पोलिसांनी खुशबूच्या बिल्डींगमधील सीसीटीवी फुटेजची पाहणी केली असता. एक बुरखाधारी व्यक्ती संशयितरित्या १९ डिसेंबर रोजी रात्री येताना व जाताना दिसून आली. त्या संशयावरून खुशबूचा मित्र  अभिमन्यू अर्जुन गुप्ता यास पोलीस ठाणेस बोलावुन त्याच्याकडे चौकशी केली असता. त्याने गुन्ह्यांची कबूली दिली. त्याला गुन्ह्यात अटक केली असून पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली मालमत्ता हस्रगत करीत आहोत.

हेही वाचाः- वृद्धाचे प्राण वाचवणाऱ्या ‘त्या’ शिपायाचा गृहमंत्र्यांनी केला सत्कार

या पूर्वीही अभिमन्यूवर अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. अभिमन्यू हा टिक टाँक स्टार असून तो सध्या चिंगरी अँपकरीता व्हिडिओ तयार करतो. त्याच्यावर विनोबा भावे पोलीस ठाण्यात  मानपाडा पोलीस ठाणे, रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे, रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे, घाटकोपर पोलीस ठाणे, जुहू पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा