माहिम दर्ग्यात 10 दिवसांचा मेळा


SHARES

माहिम - मकदूमशा बाबा दरगाह... मुंबईसह देशभरातल्या मुस्लिम बांधवांसाठीचं पवित्र स्थान. दरवर्षी माहीम दरग्यामध्ये डिसेंबर महिन्यात मकदूमशा बाबांचा 10 दिवसांचा मेळा आयोजित केला जातो. जगभरातून लाखोंच्या संख्येने लोकं या कालावधीत दर्ग्याला भेट देतात. यामध्ये सर्व धर्मियांचा समावेश असतो. 10 दिवसांसाठी माहिमच्या दर्गा परिसराला एखाद्या जत्रेसारखं रूप असतं. मुंबई पोलीसही या उपक्रमात दर्गा कमिटीसोबत असतात. मुंबई पोलिसांची विशेष कमिटी आयोजनात सहभागी असते.

यासोबतच दहशतवादविरोधी मोहिमेतही दर्गा कमिटी सक्रिय असून मुंबई पोलिसांसोबत कार्यरत असल्याचं सोहेल खंडवानी यांनी सांगितलं. सामाजिक भावनेचं प्रतीक म्हणून मेळ्यात मजारवर पहिली चादर मुंबई पोलिसांकडूनच चढवली जाते. निरनिराळ्या खाद्यपदार्थांचे, वस्तूंचे, कपड्यांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात येणार आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा