जुहू समुद्रात बुडून एकाचा मृत्यू


जुहू समुद्रात बुडून एकाचा मृत्यू
SHARES

मुंबईतल्या जुहू बीचवर एका आजोबांनी बुडत्या नातवाला वाचवण्यासाठी भरतीच्या लाटांचीही पर्वा न करता भर समुद्रात उडी घेतली. ते नातवाच्या जवळ पोहचलेही पण ते आजोबा आपल्या नातवाला वाचवू शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांचा नातू समुद्रात बुडाला. त्या वेळी तेथे जमलेल्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेत आपापल्या मोबाइलमध्ये व्हिडिओ शूटिंग करत राहिले. मात्र दोघांच्या मदतीला कोणीच धावून गेले नाही.

या घटनेनंतर मुंबईकरांमधील माणुसकी संपली आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सोमवारी संध्याकाळी 16 वर्षाचा शाहिद आपल्या आजोबांसोबत जुहू बीचवर फिरायला गेला होता. तेव्हा शाहिदला समुद्रस्नानाचा मोह आवरला नाही आणि तो समुद्रात गेला. त्यावेळी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने शाहिद बुडू लागला. ते पाहून त्याच्या आजोबांनी समुद्रात उडी घेत आपल्या नातवाला वाचवण्याचा प्रयत्न केला. ते किनाऱ्याच्या दोन मीटर अंतरापर्यंत पोहचलेही मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यावेळी त्यांनी नातवाला वाचवण्यासाठी आरडाओरडा करून मदतही मागितली. मात्र तिथल्या उपस्थितांपैकी कुणीही त्यांच्या मदतीला धावून आले नाही. ते फक्त बघत राहिले आणि व्हिडिओ शूट करत राहिले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा