कार लोन घेऊन बँकांना गंडा घालणारी टोळी गजाआड

मालवणी परिसरात काही जण बँकांना अनोळखी व्यक्तीचे खोटे बँक स्टेटमेंट, आयटी रिटन्सची खोटी बनावट कागदपत्रे देऊन वाहन कर्ज काढायची. त्यातून महागड्या गाड्या खरेदी करून या गाड्या विकायचे किंवा भाड्याने द्यायचे. बँकेचे हप्ते थकल्यावर बँक कर्मचारी जेव्हा दिलेल्या कागदपत्रांच्या पत्त्यावर जायचे, तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचं कळायचं.

कार लोन घेऊन बँकांना गंडा घालणारी टोळी गजाआड
SHARES

वाहन कर्ज काढून नंतर बँकेचे हप्ते न फेडताच परागंदा होणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीने राष्ट्रीयकृत बँकांपासून मल्टिनॅशनल बॅकांनाही गंडवल्याचं तपासात पुढे आलं आहे. या टोळीकडून पोलिसांनी तब्बल ६ महागड्या कार हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाचे पोलिस अधिक तपास करत आहेत.


कसे करायची फसवणूक?

मालवणी परिसरात काही जण बँकांना अनोळखी व्यक्तीचे खोटे बँक स्टेटमेंट, आयटी रिटन्सची खोटी बनावट कागदपत्रे देऊन वाहन कर्ज काढायची. त्यातून महागड्या गाड्या खरेदी करून या गाड्या विकायचे किंवा भाड्याने द्यायचे. बँकेचे हप्ते थकल्यावर बँक कर्मचारी जेव्हा दिलेल्या कागदपत्रांच्या पत्त्यावर जायचे, तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचं कळायचं. अशा अनेक तक्रारी मागील अनेक दिवसांपासून पोलिसांकडे येत होत्या. याबाबत गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाने स्वतंत्र तपास सुरू केला.


'असं' घेतलं ताब्यात

त्याचवेळी मालवणी परिसरात २ व्यक्ती अशाप्रकारे गाड्या विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मालवणी चर्च इथं बोगस गिऱ्हाईकाच्या मदतीने आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार पोलिसांनी एका आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून पोलिसांनी नवी मुंबईतून दुसऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. या दोघांकडून पोलिसांनी तब्बल ६४ लाख रुपये किंमतच्या नव्या कोऱ्या महागड्या गाड्या हस्तगत केल्या. या दोघांसह या प्रकरणात अन्य आरोपींचाही सहभाग असल्याचा पोलिसांना संशय असून त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.



हेही वाचा-

अभिनेता अरमान कोहली पुन्हा अडचणीत

पल्लवी पूरकायस्थ हत्येतील अारोपीला तुरूंगात सवलती नाकारल्या; पॅरोलवर असताना केले पलायन



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा