प्रियकराच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, प्रेयसी ताब्यात

मुंबईच्या महालक्ष्मी सिग्नलजवळ शनिवारी सायंकाळी ६ वर्षांची एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत वाहतूक पोलिस अतुल आहिरे यांना आढऴून आली. तापाने फणफणत असलेल्या या मुलीजवळ कुणीच नसल्याने माणुसकीच्या नात्याने आहिरे यांनी स्वखर्चाने तिला जवळच्या दवाखान्यात दाखल केलं. त्यावेळी या लहानगीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं.

प्रियकराच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, प्रेयसी ताब्यात
SHARES

विवाहित प्रियकराच्या लहान मुलीमुळे लग्नात अडसर येत असल्याच्या रागातून एका महिलेने या मुलीचं अपहरण करून तिचं लैंगिक शोषण केल्याची घटना महालक्ष्मी इथं उघडकीस आली असून आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकार?

मुंबईच्या महालक्ष्मी सिग्नलजवळ शनिवारी सायंकाळी ६ वर्षांची एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत वाहतूक पोलिस अतुल आहिरे यांना आढऴून आली. तापाने फणफणत असलेल्या या मुलीजवळ कुणीच नसल्याने माणुसकीच्या नात्याने आहिरे यांनी स्वखर्चाने तिला जवळच्या दवाखान्यात दाखल केलं. त्यावेळी या लहानगीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं.

या घटनेनंतर आहिरे यांनी तात्काळ गावदेवी पोलिसांना घटनास्थळी बोलावलं. मुलीवर वैद्यकिय उपचार सुरू असताना. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी अवघ्या काही तासात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली.

सीसीटीव्हीतून उघड

तपासादरम्यान पोलिसांनी महालक्ष्मी मंदिराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक महिला पीडित मुलीला बेशु्द्ध अवस्थेत सोडून पळून गेल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी तातडीने त्या महिलेचे फोटो सर्वत्र पाठवून तिला काही तासांत महालक्ष्मी स्टेशन परिसरातून ताब्यात घेतलं. ज्योती कांबळे (२४) असं या महिलेचं नाव आहे.

धडा शिकवण्यासाठी

अर्नाळा परिसरात राहणाऱ्या ज्योतीचे पीडित मुलीच्या वडिलांशी अनैतिक संबध होते. यातून ज्योती दोन वेळा गरोदर राहिली होती. मात्र मुलीवरील प्रेमापोटी पीडित मुलीच्या वडिलांनी ज्योतीला गर्भ पाडण्यास भाग पाडलं. याचाच राग मनात धरून पीडित मुलीच्या वडिलांना धडा शिकवण्यासाठी ज्योतीने पीडित मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैगिक अत्याचार केल्याची कबुली ज्योतीने पोलिसांना दिली.

हा गुन्हा पुढील तपासासाठी अर्नाळा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आल्याचं अर्नाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक केशव नाईक यांनी सांगितलं.

हेही वाचा-

जीटी रुग्णालयातील डाॅक्टरला मारहाण

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा