जीटी रुग्णालयातील डाॅक्टरला मारहाण

हितेंद्रला राग अनावर झाल्याने त्याने डाॅ. वाकडे यांना लाथ मारली. त्यानंतर हितेंद्रचा भाऊ हिमांशू आणि अशितोष झोरे यांनी देखील डाॅ. वाकडे यांना धक्काबुकी करत मारण्याची धमकी दिली.

जीटी रुग्णालयातील डाॅक्टरला मारहाण
SHARES

केईएममध्ये डाॅक्टरांना मारहाण झाल्याच्या घटनेला शनिवारी एक वर्ष पूर्ण होत नाही, तोच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील गोकुळदास तेजपाल अर्थात जीटी रुग्णालयाच्या आत्पकालीन विभागातील डाॅक्टरांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी रुग्णाच्या भावासह एका मित्राला अटक केली आहे. हिमांशू भूरके (३२) आणि अशितोष झोरे (२३) अशी या दोघांची नावे असून न्यायालयाने दोघांना २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


काय आहे प्रकार?

केईएम रुग्णालयातील डाॅक्टरांना मारहाण झाल्यानंतर डाॅक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यावेळी राज्यभरातील निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेले होते. के. ई. एम.चे तत्कालीन अधिष्ठाता डाॅ. अविनाश सुपे यांनी केलेल्या विनंतीनंतर पोलिस महासंचालकांनी सर्व रुग्णालयात अतिरिक्त पोलिस तैनात करण्याचंही मान्य केलं. त्यानंतर सर्व शासकीय रुग्णालयात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.


पाणी नाकारलं म्हणून

या घटनेला शनिवारी एक वर्ष पूर्ण होत नाही. तोच जीटी रुग्णालयात रुग्णासह त्याच्या नातेवाईकांकडून पुन्हा आत्पकालीन विभागातील डाॅक्टरांना मारहाण केली. शनिवारी सकाळी डाॅ. विश्वजीत वाकडे हे जीटीच्या आप्तकालीन विभागात रुग्णांना तपासत होते. त्यावेळी हितेंद्र भूरके (२८) यांना अस्वस्थ वाटत असल्याने ते उपचारासाठी रुग्णालयात आले. त्यांना नेमका काय त्रास होत आहे, याची डाॅ. वाकडे विचारपूस करत असताना हितेंद्रने त्यांच्या नातेवाईकांकडे पिण्यासाठी पाणी मागितलं. मात्र पाणी प्यायल्यास हितेंद्र यांना आणखी त्रास होऊ शकतो, असं सांगत डाॅ. वाकडे यांनी हितेंद्रला पाणी देण्यास नकार दिला.


गुन्ह्याची नोंद

त्यावेळी हितेंद्रला राग अनावर झाल्याने त्याने डाॅ. वाकडे यांना लाथ मारली. त्यानंतर हितेंद्रचा भाऊ हिमांशू आणि अशितोष झोरे यांनी देखील डाॅ. वाकडे यांना धक्काबुकी करत मारण्याची धमकी दिली. याबाबत डाॅ. वाकडे यांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा नोंदवला. त्यानुसार आझाद मैदान पोलिसांनी रुग्ण हितेंद्र भूरके, हिमांशू भूरके आणि अशितोष झोरे यांच्या विरोधात ३५३,३३२,३२३,५०६,३४ भा.द.वि कलमांसह महाराष्ट्र वैदयकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था कायद्यांयांर्गत गुन्हा नोंदवल्याची माहिती पोलिस उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांनी दिली.



हेही वाचा-

सीबीएसईचे पेपर लीक करणारा एबीव्हीपीचा नेता, १२ जणांना झाली अटक

रागातून तरूणावर चाकूहल्ला, दोघांना अटक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा