डोंबिवली गँगरेप प्रकरण : २८ जणांना बेड्या

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात आतापर्यंत ३३ आरोपींची नावं समोर आली आहेत.

डोंबिवली गँगरेप प्रकरण : २८ जणांना बेड्या
SHARES

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात आतापर्यंत ३३ आरोपींची नावं समोर आली आहेत. यामधील २८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर पाच आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत.

गुरुवारी २६ जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आणखी दोघा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यामुळे डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या २८ वर गेली आहे. यामधील आरोपी नवी मुंबई, डोंबिवली इथं राहणारे असल्याची माहिती एसपी सोनाली ढोले यांनी दिली.

प्रियकरानं जानेवारी महिन्यात पीडित मुलीवर बलात्कार करत व्हिडीओ काढला होता. या व्हिडीओच्या आधारे पीडित अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर अनेक जणांनी बलात्कार केल्याची माहिती सध्या समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आणखी काही आरोपींची नावं निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

डोंबिवलीत राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीनं मानपाडा पोलीस ठाण्यात आपल्यावर ८ महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरू असल्याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडित तरुणीला विश्वासात घेत चौकशी सुरू केली.

जानेवारी महिन्यात पीडित तरुणीवर तिच्या प्रियकरानं बलात्कार करत तिचा व्हिडीओ काढला होता. हा व्हिडीओ या तरुणानं आपल्या मित्रांना दाखवला. या व्हिडीओच्या आधारे आतापर्यंत ३३ जणांनी या पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं.

बदलापूर, रबाळे, मुरबाड आणि डोंबिवलीत वेगवेगळ्या ठिकाणी तिला घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला गेला. मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत २८ जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यामध्ये दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत.



हेही वाचा

भाजपा कार्यालयात महिलेवर लैंगिक अत्याचार, पोलिसात तक्रार दाखल

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी 'हा' आपत्कालीन क्रमांक सुरू केला

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा