साकीनाकातून तब्बल ३४५ किलोचा गांजा जप्त


साकीनाकातून तब्बल ३४५ किलोचा गांजा जप्त
SHARES

मुंबईतील साकीनाका येथून पोलिसांनी तब्बल३४५ किलोचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काल नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत एकाला अटक केली आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर ड्रग्स प्रकरणांचा शोध अधिक तीव्रतेने होऊ लागला. त्यानंतर त्या संबंधित अनेक व्यक्तींची NCB कडून चौकशी करण्यात आली. तर अद्याप धाडसत्र सुरुच आहेत.

हेही वाचाः- संजय राऊत सहकुटुंब शरद पवारांच्या भेटीला

साकीनाका पोलीस ठाणे हद्दीत संघर्षनगर,चांदीवली,मुंबई येथे मोठया प्रमाणात गांजा या अंमली पदार्थाचा साठा करून ठेवले असल्याची माहिती साकीनाका पोलिसांना मिळाली. या गोपनीय माहीतीगाराद्‌वारे इमारत क.९०/एच,संघर्ष नगर,चांदीवली येथे छापा टाकला असता, एकुण ३४५ किलो ५२५ ग्रॅम गांजा पोलीसांनी जप्त केला. बाजारात या गांजाची किंमत ५१,८२,८७५/-- इतकी आहे. या प्रकरणी पोलीसांनी अशोक माणिक मेत्रे, जय ३९ वर्षे यांस अटक करण्यात आली आहे. या दोघांवर साकीनाका पोलीस ठाण्यात विशेषकलम ८(क),२० (ब)(१)(क) अंमली पदार्थ विरोधी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ

सध्या राज्यात ड्रग्स प्रकरणं गाजत आहे. ड्रग्य प्रकरणात एनसीपी नेते आणि मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान याला एनसीबी कडून अटक करण्यात आली आहे. यापूर्वी प्रसिद्ध मुच्छड पानवाला चे मालक राजकुमार तिवारी यांना अटक करण्यात आली होती. तर सोमवारी, बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याची बहिण कोमल रामपाल हिची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. दरम्यान, मुंबईतील दोन ठिकाणी एनसीबीकडून धाड टाकण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक माहितीची प्रतिक्षा आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा