साडेचार फुट लांबीचा मांडुळ जप्त


साडेचार फुट लांबीचा मांडुळ जप्त
SHARES

मुंबई पोलिसांच्या मालमत्ता शाखेने साडेचार फूट लांबीच्या मांडुळासह एका व्यक्तीला अटक केली आहे. तब्बल 3 किलो वजनी या सापाची किंमत ही 30 लाखांच्या घरात असून अात्तापर्यंत पकडण्यात आलेला हा सगळ्यात मोठा मांडुळ साप असल्याचा दावा मलमत्ता कक्षाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या मांडुळाबाबत अनेक अंधश्रद्धा तसेच गैरसमज असल्याने त्याच्या तस्करीच प्रमाण वाढले आहे.

मांडुळाला विकण्यासाठी एक व्यक्ती भायखळा येथे सोमवारी रात्री येणार असल्याची माहिती मालमत्ता कक्षाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा लावत सापासह आरोपी नावीद शेख (36) याला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार नावीद शेख हा विरारचा रहिवाशी आहे. तो एक रियल इस्टेट एजंट आहे. पण सध्या बाजारात मंदी आल्याने त्याने हे प्रताप सुरू केल्याची मालमत्ता कक्षाच्या अधिकाऱ्याने सांगितले. हा साप गडद-तपकिरी काळसर रंगाचा असून त्याच्या बाबतीत अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज असल्याने त्याची तस्करी केली जाते.

मांडुळाबाबतचे गैरसमज

मांडुळाचा तोंडाकडचा आणि शेपटीकडचा भाग सारखाच असल्याने तो दुतोंडी आहे

मांडुळाची पूजा करून सोडल्यावर तोच गुप्तधनाचा शोध लावतो

हा साप सहा महिने एका तोंडाने आणि सहा महिने दुसऱ्या तोंडाने चालतो

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा