अफवा पसरवणाऱ्यांविरोधात ४८० गुन्हे दाखल

४८० जणांविरोधात गुन्हे दाखल केले असून २५८ व्यक्तींना अटक केली असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.

अफवा पसरवणाऱ्यांविरोधात ४८० गुन्हे दाखल
SHARES

लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये अनेक जण आलेले मॅसेज पुढे पाठवण्यात मग्न आहेत. तर काही जण जाणून बुजून तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कृत्य करत असल्याने निर्शनास आले आहे.  मात्र अशा प्रकारचे अफवा पसरवणाऱ्यांविरोधात सायबर पोलिसांनी कडक पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. सायबर पोलिसांनी आतापर्यंत ४८० जणांविरोधात गुन्हे दाखल केले असून  २५८ व्यक्तींना अटक  केली असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.

हेही वाचाः- मुंबईतील 'या' वॉर्डांमधील कोरोना रूग्णांची संख्या अनेक राज्यांपेक्षा अधिक

  राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४८० गुन्ह्यांची (ज्यापैकी ३२ N.C आहेत) नोंद १५ जून २०२० पर्यंत झाली आहे.  त्यात प्रामुख्याने आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९५ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १९६  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,tiktok विडिओ शेअर प्रकरणी  २५ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी  ९ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ५१ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत  २५८ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.

हेही वाचाः- सध्या तर मुंबईत येण्याचं माझंही धाडस नाही, नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

तसेच राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे २२ मार्च ते १५ जून  या कालावधीत कलम १८८ नुसार  १,३०,३९६ गुन्हे नोंद झाले असून २६,८८७  व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ७ कोटी ६५ लाख १९ हजार ७०१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २६६ घटना घडल्या असून त्यात ८५१ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा