Advertisement

अर्धा डझन बोगस डाॅक्टर पोलिसांच्या जाळ्यात

विशेष म्हणजे या सर्वांचे शिक्षण १० ही नाही आणि हे स्वतःला डाॅक्टर म्हणवून घ्यायचे.

अर्धा डझन बोगस डाॅक्टर पोलिसांच्या जाळ्यात
SHARES
Advertisement

कोणतीही पदवी नसताना रुग्णांवर उपचार करून त्याची लुबाडणूक करणे हा गोवंडीत अनेकांचा पेशाच झाला आहे. डिसेंबर महिन्यात या भागातून ४ बोगस डॅाक्टरांना अटक केल्यानंतर नुकतेच पून्हा अर्धा डझन बोगस डाॅक्टर गुन्हे शाखा पोलिसांच्या हाथी लागले आहेत. मुकूल किसनादास(३४), मकसूद अहमद मोहम्मद रिझवान अन्सारी(४२), किस्मत अली सलाह शहा (३१), तय्यब अली अब्दुला चौधरी (५०), मुक्तारअली बरकतअली शाह (४५) अशी या बोगस डाॅक्टरांची नावे आहेत. विशेष म्हणजे या सर्वांचे शिक्षण १० ही नाही आणि हे स्वतःला डाॅक्टर म्हणवून घ्यायचे. 

हेही वाचाः- कोरोनाचे आणखी ४ संशयित रुग्ण


मुंबईत मागील तीन महिन्यांत २३ बोगस डॉक्टरांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. कुणी आपली ओळख हकीम, तर कुणी आयुर्वेदीक दवाखाने उघडून गोवंडीत नागरिकांची फसवणूक करायचे. नुकतेच या भागातून ४ बोगस डाॅक्टरांना अटक करून दोन महिने उलटत नाही. तोच पून्हा या भामट्यांनी गलोगली आपली दुकाने थाटली होती. याबाबतची माहिती गुन्हे शाखा ६ च्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परिसरातील दवाखान्यांची झाडाझडती सुरू केली. या कारवाईत डाॅक्टर असल्याचे सांगून नागरिकांची फसणूक करत त्यांना लुबाडणाऱ्या ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

हेही वाचाः- राज्यात पोलिसांची ‘घर घर’ संपणार! पोलिसांना मिळणार १० हजार घरं

विशेष म्हणजे यातील एका ही आरोपीचे शिक्षण दहावीच्या पुढे गेलेले नाही. असे असताना खुद्द डाॅक्टर असल्याचा पेहराव करून ही मंडळी आपल्या दवाखान्यात डाॅक्टर असल्यासारखे वागून नागरिकांवर उपचार करायचे. या बोगस डॉक्टरांकडून पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या, औषधे, इंजेक्शन आणि उपचार करण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत केले आहे.  गेल्या तीन वर्षांपासून या बोगस डॉक्टरांनी दवाखाने सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईनंतर सर्वसामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हे शाखेची मोहीम अधिक तीव्र झाली आहे.


संबंधित विषय
Advertisement