दुकानदारांना बोलण्यात गुंतवून, ज्वेलर्समध्ये चोरी करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश

निलेश यांना बोलण्यात गुंग करून हातचलाखी त्यातील एका महिलेने २४,४५० ग्रॅम वजनाच्या २ सोन्याच्या बांगड्या (५० ग्रॅम) कि. अ २,५०,००० रुपयाच्या घेऊन पळ काढला.

दुकानदारांना बोलण्यात गुंतवून, ज्वेलर्समध्ये चोरी करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश
SHARES

मुंबईत ज्वेलर्स मालकाला बोलण्यात गुंतवून दुकानात चोरी करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश भायखळा पोलिसांनी केला आहे. साजादा उर्फ अंनु बशीर अन्सारी (३०), नाजिया इजराइल शेख (३०), नसरिन बशीर शेख (५०), यास्मिन अझरुदद्दीन खान (३५) अशी या महिला आरोपींची नावे आहेत. या सर्व महिला  मालेगावच्या रहिवाशी असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहेत.

हेही वाचाः- १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या रिक्षांवर बंदी

मूळच्या नाशिक येथील मालेगावच्या रहिवाशी असलेल्या सर्व आरोपी महिला मुंबईत दुकानात येऊन घोळका करून ज्वेलर्समध्ये खरेदीसाठी जातात. त्यावेळी दुकानदाराला बोलण्यात गुंतवून त्या एखादा दागिना दुकानदाराच्या न कळत चोरून पळ काढतात.  ५ सप्टेंबर रोजी या महिलांनी भायखळा पोलिस ठाणे परिसरातील शिवम ज्वेलर्सचे मालक निलेश  जैन यांना अशा प्रकारे गंडा घातला. ज्वलर्समध्ये  सुरवातीला तीन  बुरखाधारी महिलांनी प्रवेश केला. त्यावेळी निलेश यांना बोलण्यात गुंग करून हातचलाखी  त्यातील एका महिलेने २४,४५० ग्रॅम वजनाच्या २ सोन्याच्या बांगड्या (५० ग्रॅम) कि. अ २,५०,००० रुपयाच्या घेऊन पळ काढला. हीबाब निलेश यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भायखळा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. निलेश यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी  कलम ४२०,३४ भा. द .वि गुन्हा नोंदवण्यात आला.

हेही वाचाः-  बेस्ट समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही शिवसेनेची बाजी

पोलिसांनी तांत्रिकदृष्या तपास करून त्यातील एका महिलेचा मोबाइलनंबर मिळवला. त्या फोननंबरचा मागकाढत पोलिस २ आँक्टोंबर रोजी मालेगाव नाशिक येथे रवाना झाले. पोलिस आरोपी महिलांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी हे मालेगाव येथून मुंबई येथे जाण्यासाठी स्विफ्ट गाडी क्रमांक एम एच ०५ ए वाय ४०७३ ने निघाले आहेत, या माहितीच्या आधारे पोलिसांची दोन पथके वेगवेगळ्या टोल नाक्यावर रवाना केली. त्यावेळी मुलुंड टोल नाका येथे सापळा लावला असता. वर नमूद वर्णनाची मोटर कार त्यामध्ये चार बुरखाधारी महिला बसलेल्या दिसून आल्या या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या महिलांकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्यांची कबूली दिली. या महिलांविरोधात महाराष्ट्र आणि इतर राज्यात असे ८ गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने या आरोपी महिलांना ७ आँक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा