भुजबळांविरोधात आणखी एका गुह्याची नोंद

Oshiwara
भुजबळांविरोधात आणखी एका गुह्याची नोंद
भुजबळांविरोधात आणखी एका गुह्याची नोंद
भुजबळांविरोधात आणखी एका गुह्याची नोंद
See all
मुंबई  -  

भुजबळ कुटुंबीयांच्या अडचणी संपण्याची चिन्हे नाहीत. समीर आणि पंकज भुजबळ यांच्याविरोधात नुकताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आणखी एक गुन्हा नोंदवला आहे.


गुन्हा का दाखल झाला?

ओशिवरा येथील म्हाडाच्या रहिवासी भूखंडावर खोटी गृहनिर्माण संस्था स्थापन करून परवानगी नसतानाही त्या संपूर्ण भूखंडावर कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारल्याप्रकरणी समीर आणि पंकज भुजबळ यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे या गुह्यात अनेक बड्या अधिकाऱ्यांना देखील आरोपी बनवण्यात आले आहे. प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल होताच या इमारतीवर गुरुवारी धाड टाकण्यात आली.


बेहिशोबी मलमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळा संबंधातली ही पुढची करवाई आहे.
- किरीट सोमय्या, नेता, भाजपा


एफआयआरमध्ये या अधिकाऱ्यांची नावे

 • शिरीष शृंगारपुरे, तत्कालीन भूमापक
 • सूर्यकांत देशमुख, तत्कालीन सहायक भू-व्यवस्थापक
 • सुरेश कारंडे, म्हाडाचे तत्कालीन मुख्य अधिकारी

यांनी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांची कोणतीही पडताळणी न करता बोगस सभासदांना पात्र ठरवल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी) च्या तपासातून समोर आले आहे.

यांच्यावरही गुन्हा दाखल

 • अनिल वेलिंग, मुंबई मंडळाचे तत्कालीन वास्तुशास्त्रज्ञ
 • श्यामसुंदर शिंदे, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी
 • संजय सिंह गौतम, सह मुख्य अधिकारी, म्हाडा
 • उत्तम खोब्रागडे, म्हाडाचे तत्कालीन उपाध्यक्ष आणि मुख्य अधिकारी
 • सुभाष सोनावणे, मुख्य अधिकारी
 • दीपक मंण्डलेकर, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ


अधिकार नसतानाही बेकयदेशीररित्या खोट्या गृहनिर्माण संस्थेला शासनाकडून मिळालेल्या निवासी भूखंडाचा वापर 100 टक्के अनिवासी करण्यास अनुमती दिल्याचा ठपका यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात प्रमोटर असलेल्या भावेश बिल्डर्सचे संचालक असलेले पंकज आणि समीर भुजबळ यांना देखील आरोपी करण्यात आले आहे.


कसा झाला कोट्यवधींचा घोटाळा

 • हर्षवर्धन चेंबर्स मेसर्स तुलसी कमर्शियल प्रिमायसेस को. ऑप. हाउसिंग सोेसायटी 2001 साली तयार करण्यात आली
 • तुलसी कॉ ऑप हा. सोसायटीने म्हाडाकडे रेसिडेंशीअल प्लॉटसाठी अर्ज केला होता
 • सोसायटीच्या सदस्यांकरीता राहण्यासाठी हाउसिंग सोसायटी बांधण्यासाठी ओशिवरा पोलिस स्टेशनच्या बाजूला प्लॉट क्रमांक R4L CTS No. 41PT खोटी गृहनिर्माण संस्था स्थापन केली
 • ऑक्टोबर 2002 मध्ये म्हाडाने हा प्लॉट तुलसी को. ऑप. हा. सोसायटीला दिला
 • मे 2003 मध्ये म्हाडा आणि तुलसी को. ऑप. हा. सोसायटीमध्ये लीज ॲग्रीमेंट करण्यात आली
 • फेब्रुवारी 2003 मध्ये तुलसी सीएचएसने भावेश बिल्डर प्रा. लि. हा बिल्डर नेमला
 • या जागेवर रहिवासी गृहनिर्माण संस्थेच्या जागी कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्यात आली ज्याची किमत कोट्यावधी रुपयांची आहे
 • हे सर्व प्रिमायसेस भावेश बिल्डरकडून विकण्यात आले. पण ते एकाही सोसायटीच्या सदस्यांना विकले नाहीहे देखील वाचा - 

भुजबळ म्हणतायत 'आता तरी सोडा राव'!

दीड वर्षांनंतर भुजबळ विधिमंडळात ठेवणार 'पहिलं पाऊल'डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.