‘त्या’ गर्दुल्याला लिफ्ट देणं पडलं महागात, टॅक्सी चालकाचा अपघाती मृत्यू

पैसे नसून जवळच्या व्यक्तीला फोन करून त्याला पैसे घेऊन येण्यास सांगतो, असे सांगून तो इरफान यांच्याकडे फोन मागू लागला. मात्र इरफान यांनी फोन देण्यास नकार देताच, आरोपीने त्याच्याकडून जबरदस्ती फोन हिसकावून पळ काढला.

‘त्या’ गर्दुल्याला लिफ्ट देणं पडलं महागात, टॅक्सी चालकाचा अपघाती मृत्यू
SHARES

 एका गर्दुल्याला लिफ्ट देणं भायखाळ्यातील एका टॅक्सी चालकाच्या जीवावर बेतलं, लिफ्टच्या बहाण्याने गाडीत बसलेल्या गर्दुल्याने भाड्याचे पैसे न देण्यावरून टॅक्सी चालकाशी हुज्जत घालण्यास सुरूवात करत, अचानक त्याला धक्का देऊन त्याचा मोबाइल हिसकावून पळ काढला. त्या गर्दुल्याचा पाठलाग करताना त्या वयोवृद्ध टॅक्सी चालकाचा मृत्यू झाला. या प्रकऱणी जे.जे. मार्ग पोलिसांनी  शर्तीचे प्रयत्न करून आरोपीला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक याकुब मुल्ला यांनी दिली.

हेही वाचाः- योगींनी मुंबईतच केली फिल्म सिटीची अधिकृत घोषणा

भायखळाच्या दुसरी क्राँस लेन, संत सावता मार्ग, खान बिल्डिंग मध्ये राहणारे इरफान खैउल्ला सिद्धकी (५५) हे टॅक्सी चालक आहेत. रविवारी इरफान हे भाड्याच्या शोधात उभे होते. त्यावेळी आरोपी मोहम्मद हमिद मोहम्मद इक्बाल शेख (३६) हा त्याच्याजवळ आला. त्याने भेंडीबाजारला जाण्यासाठी इरफान यांच्या टॅक्सीत बसला. इरफान टॅक्सी घेऊन भारत हाँटेल, एस.व्ही.पी.रोड भेंडीबाजार येथे घेऊन आला. त्या ठिकाणी आल्यानंतर शेख हा भाड्याचे पैसे देण्यास नकार देऊन लागला. पैसे नसून जवळच्या व्यक्तीला फोन करून त्याला पैसे घेऊन येण्यास सांगतो, असे सांगून तो इरफान यांच्याकडे फोन मागू लागला. मात्र इरफान यांनी फोन देण्यास नकार देताच, आरोपीने त्याच्याकडून जबरदस्ती फोन हिसकावून पळ काढला. त्याच्या पाठोपाठ धावताना, इरफान यांना धाप लागली आणि ते जमिनीवर कोसळले.

हेही वाचाः- कोरोनाची लस सर्वातआधी कोणाला मिळणार? आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

त्यांना जवळील शासकिय रुग्णालयात नेले, मात्र त्या ठिकाणी डाँक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जे.जे.मार्ग पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी आले. या प्रकऱणी पोलिसांनी आरोपी विरोधात ३०४,३९२,३४ भा.द.वि अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी रस्त्यावरील सीसीटिव्हीच्या मदतीने आरोपीचा माग काढून त्याला पायधुनी परिसरातून अटक केली. या प्रकऱणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा