महिलांची छेड काढणारा सराईत आरोपी अटकेत


महिलांची छेड काढणारा सराईत आरोपी अटकेत
SHARES

रात्रीच्या वेळेस एकटी असलेल्या महिलांच्या पाटीवर आणि समोरून हात मारून पसार होणाऱ्या सराईत गुन्हेगाराला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. याला अटक करण्यासाठी पोलिसांनी सतत दोन महिने रात्रीच्या वेळेस जागता पहारा ही दिला, मात्र हा पोलिसांच्या हातून नेहमी वाचत होता. दुचाकीवरून जात असलेल्या महिलांच्या पाठी मारून आपल्या दुचाकीवर हा पसार होऊन जायाचा. एक गुन्ह्यात आरोपीने केलेल्या या अश्लील कृत्यामुळे महिला दुचाकीवरून पडली आणि तिचा जीव अगदी थोडक्यात वाचला. या महिले सोबत  या विक्षिप्त आरोपीने तर २ वेळा हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचाः- मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरतेय..!

विशेष करून रात्री ११ ते ११.३० च्या सुमारास, रहदारी कमी असलेल्या ठिकाणी एकटी महिला पाहून या आरोपीकडून हे कृत्य दर ४ ते ५ दिवसांनी केलं जायचं. काही महिलांना सोबत पर त्याने दोन वेळा हे कृत्य केलं आहे. एखाद्या दिवशी हे कृत्य करून परत तीन ते चार दिवस हा नराधम शांत बसायचा जेणेकरून पकडले जाऊ नये. तर दुसरीकडे आपली बदनामी होऊ नये या भीतीने महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही देत नव्हत्या,  याचाच फायदा हा वारंवार घेत होता. असं म्हणतात की "वाईटाचा अंतर निश्चित आहे" आणि असंच काहीसं या आरोपी बरोबर सुद्धा झालं, माटुंगा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका महिले बरोबर यांनी हेच कृत्य केलं. या  महिलेने धाडस दाखवत पोलिसात या घटनेची तक्रार केली. पोलीसांनी सुद्धा क्षणाचाही विलंब न करता या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा नोंदवला.

हेही वाचाः- मुंबईत परजिल्ह्यातून येणारे दूध भेसळमुक्त; दुधाचा दर्जाही  कमी प्रतीचा

पोलीस उपनिरीक्षक संदीप अहिरराव, पोलीस हवालदार संदीप शिंदे आणि पोलीस नाईक धर्मेंद्र जुवाटकर हे पथक तयार करण्यात आलं आणि या पथकावर या आरोपीला पकडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संदीप अहिरराव यांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला. दादर,माटुंगा,सायन,वडाळा, परळ, या सर्व भागात पोलिसांनी जागता पहारा ठेवला. सतत दोन महिने अहोरात्र पोलीस त्याच्या शोधात डोळ्यात तेल घालून जागे राहिले आणि या आरोपीचा शोध सुरू ठेवला. सीसीटीव्हीची सुद्धा मदत घेण्यात आली मात्र रात्रीची वेळ असल्यामुळे आणि बाइक अगदी वेगाने पळवल्यामुळे सीसीटीव्ही मधून सुद्धा पोलिसांना काही विशेष मदत झाली नाही. मात्र एक दिवस रात्रीच्या वेळेस आरोपीच्या गाडीचा नंबर पोलिसांच्या नजरेस पडला आणि याच्या आधारे आरोपीचा पत्ता शोधत पोलिसांनी त्याला कोक्री आगार, सायन या ठिकाणाहून अटक केली. कलम२७९,३३७,३५४, ३५४ (ड) १३४ यानुसार या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ज्या महिलांना बरोबर असे प्रकार घडले असतील त्या महिलांनी पुढे येऊन तक्रार देण्यासाठी पोलीस उपायुक्त विजय पाटील यांच्या कडून आव्हान करण्यात आलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा