सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दिपिका पदुकोनची होणार चौकशी

एनसीबीने आता शुक्रवारी अभिनेत्री दिपिका पदुकोन हिला चौकशीसाठी बोलावले आहे

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दिपिका पदुकोनची होणार चौकशी
SHARES

दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत (Sushant singh rajput) यांच्या आत्महत्या प्रकरणात उघडकीस आलेल्या ड्रग्ज कनेक्शनच्या चौकशीसाठी आता अनेक नामकिंत व्यक्तींना नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशीला बोलावले होते. या चौकशीचा भाग म्हणूनच प्रसिद्ध फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा हिची गुरूवारी एनसीबीने चौकशी करून जबाब नोंदवला. एनसीबीने आता शुक्रवारी अभिनेत्री दिपिका पदुकोन हिला चौकशीसाठी बोलावले आहे. तिच्यासह सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रित सिंग यांचीही लवकरच चौकशी एनसीबीकडून केली जाणार असल्याचे सांगितले जाते.

एनसीबीच्या चौकशीसाठी खंबाटा सकाळी १० च्या सुमारास एनसीबीच्या कार्यालयात आली होती. एनसीबीच्या चौकशीत जया साहा याची मॅनेजर करिश्मा हिचे आणि दिपिकाचे व्हाॅट्स चॅट समोर आले आहेत. जया साहा ही सुशांतची टैलेंट मॅनेजर होती. जिची एनसीबीने नुकतीच या प्रकरणी चौकशी केली. या पूर्वी तिच्या मोबाइलमधून मिळालेल्या माहितीतून श्रद्धा कपूर ( Shraddha Kapoor)चे चॅट सापडले होते. त्यात श्रद्धा कपूर सीबीडी आॅईल मागत असल्याचे म्हटले जाते. तर जया साहाची मॅनेजर करिश्मा हिच्या मोबाइलमध्ये ती दिपिका पदुकोन (Deepika Padukone )च्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आले आहे. तर फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा हिचेही नाव पुढे आले होते. लवकरच एनसीबी करिश्माला चौकशीसाठी समन्स करणार असल्याचे बोलले जाते. तिच्या चौकशीतून दिपिका, श्रद्धा या दोघी नेमकं का त्यांच्या संपर्कात होत्या ते कळू शकेल. म्हणूनच एनसीबीने दिपीका पदुकोन, श्रद्धा कपूर, सारा अली खान, सिमोन खंबाटा आणि रकुल प्रित सिंग यांना चौकशीसाठी समन्स बजावले.

हेही वाचाः- रोहितची अर्धशतकी खेळी, 'केकेआर' विरुद्धच्या सामन्यात 'मुंबई'चा दमदार विजय

त्यानुसार सिमोन ही गुरूवारी सकाळी चौकशीसाठी हजर राहिली होती. त्यावेळी तिने मिडियाशी बोलणे टाळले. तर दुसरीकडे रकुलने आपल्याला कुणीही चौकशीसाठी समन्स केले नाही. तर अभिनेत्री दिपिका पदुकोनला शुक्रवारी सकाळी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश एनसीबीने दिले आहे. त्यामुळे उद्या दिपिका पदुकोनची एनसीबीकडून चौकशी होऊ शकते. सुशांत सिंग राजपूत आत्मत्या प्रकरणाला तीन महिने उलटत आले. मात्र अद्याप सुशांतने आत्महत्या नेमकी का ? केली हे अद्यास गुलदस्त्यात आहेत. सुशांतने नेमकी आत्महत्या केली की, त्याची हत्या करण्यात आली. यावरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरू असताना. सुशांत अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे रिया चक्रवर्तीच्या चौकशीतून पुढे आल्यानंतर एनसीबीने या प्रकरणात २१ जणांना अटक केली.

हेही वाचाः- निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण, 'अग्गबाई सासूबाई' मालिकेतील इतर कलाकार...

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा