दिपिका, सारा अली खान, रकूल प्रित, श्रद्धा कपूरला एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स

चौकशीतून दिपिका, श्रद्धा या दोघी नेमकं का त्यांच्या संपर्कात होत्या ते कळू शकेल.

दिपिका, सारा अली खान, रकूल प्रित, श्रद्धा कपूरला एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स
SHARES

अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्स प्रकरणाचा तपास एनसीबी (NCB) करत आहे. एनसीबीच्या चौकशीत बॉलिवूडमधील अनेक बड्या तारकांची नावे आता समोर येत आहेत. त्यात अभिनेत्री श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खान सारख्या अनेक उगवत्या तार्‍यांनंतर आता दीपिका पादुकोणचे ही नाव चौकशीत समोर आल्याचे बोलले जाते. या चौघांना आता एनसीबीकडून चौकशीसाठी आता समन्स बजावण्यात आले आहे.

हेही वाचाः- माणकोली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

एनसीबीच्या चौकशीत जया साहा याची मॅनेजर करिश्मा हिचे आणि दिपिकाचे व्हाॅट्स चॅट समोर आले आहेत. जया साहा ही सुशांतची टैलेंट मॅनेजर होती. जिची एनसीबीने नुकतीच या प्रकरणी चौकशी केली. या पूर्वी तिच्या मोबाइलमधून मिळालेल्या माहितीतून श्रद्धा कपूर ( Shraddha Kapoor)चे चॅट सापडले होते. त्यात श्रद्धा कपूर सीबीडी आॅईल मागत असल्याचे म्हटले जाते. तर जया साहाची मॅनेजर करिश्मा हिच्या मोबाइलमध्ये ती दिपिका पदुकोन (Deepika Padukone )च्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आले आहे. लवकरच एनसीबी करिश्माला चौकशीसाठी समन्स करणार असल्याचे बोलले जाते. तिच्या चौकशीतून दिपिका, श्रद्धा या दोघी नेमकं का त्यांच्या संपर्कात होत्या ते कळू शकेल.

हेही वाचाः- मुंबईत पुढच्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता

सुशांत सिंग राजपूत आत्मत्या प्रकरणाला तीन महिने उलटत आले. मात्र अद्याप सुशांतने आत्महत्या नेमकी का ? केली हे अद्यास गुलदस्त्यात आहेत. सुशांतने नेमकी आत्महत्या केली की, त्याची हत्या करण्यात आली. यावरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरू असताना. सुशांत अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे रिया चक्रवर्तीच्या चौकशीतून पुढे आल्यानंतर एनसीबीने या प्रकरणात २१ जणांना अटक केली. तर चौकशीत अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत, डिझायनर सिमोन खंबाटा यांची नावे पुढे आल्यानंतर एनसीबी त्यांना समन्स बजावले असून त्यांना आता चौकशीला बोलावले आहे.

हेही वाचाः- मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी न्यायालयात अर्ज

रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक हे सॅम्युअल मिरांडा तसेच दिपेश सावंतच्या माध्यमातुन ड्रग्ज तस्करांच्या होती. त्यानुसार, एनसीबीने मुंबई आणि गोवा येथे छापे मारले होते. आतापर्यंत याप्रकरणी २१ जणांना अटक केली आहे. एनसीबीच्या चौकशीत रियाने सारा अली खान, रकुल प्रीत, डिझायनर सिमोन खंबाटा यांची नावे पुढे आली असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले. दरम्यान, त्याच्यापैकी कोणालाही अद्याप समन्स पाठवण्यात आलेला नाही. या आठवड्यात समन्स पाठवण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. रियाने केवळ गांजा आणि एमडी हे ड्रग्ज सुशांतला दिले नाही. तर कोकेनसारखे हाय प्रोफाईल ड्रग्ज देखील वापरल्याचे आत्तांपर्यंतच्या तपासांत समोर आले आहे. तसेच याप्रकरणी अनेक बाॅलिवुड सेलिब्रेटीजना समन्स पाठविण्यात येणार आहे. तर काही तस्कराना अटक होण्याची शक्यता असल्याचे एनसीबीने स्पष्ट केले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा