वडाळ्यात पोलिसांची सतर्कता बैठक

 wadala
वडाळ्यात पोलिसांची सतर्कता बैठक
wadala, Mumbai  -  

वडाळा - दहशतवादी हल्ल्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यासाठी गुरुवारी जीआरपी आणि आरपीएफच्या वतीने समन्वय बैठक घेण्यात आली. या बैठकीला रेल्वे प्रवासी समिती सदस्यांसह महिला दक्षता समितीचे सदस्यही उपस्थित होते. वडाळा (पू.) येथील तेजसनगरच्या बीपीटी वसाहतीत बैठक पार पडली.

येत्या काळात मुंबईत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गोपनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. याबाबत सतर्कतेचा इशारा या बैठकीत देण्यात आला. तसेच मागील काही दिवसांपूर्वी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयात घडलेल्या घातपाती घटनेसंबधी चर्चा करून अशा घटना आपल्या कार्यक्षेत्रात होऊ नयेत तसेच रुळालगत घडणाऱ्या गुन्ह्यांची, त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे सदरील बैठकीत चर्चा करण्यात आली.

Loading Comments